Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

धानोरीत भरदिवसा घरफोडी, ११ लाखांचे दागिने चोरीला

धानोरीतील लोटस ग्रेस सोसायटी कमलपार्क लेनक्रमांक ११ मध्ये घडली घटना

marathinews24.com

पुणे – घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १० लाख ८० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना ३१ जानेवारीला भरदुपारी बाराच्या सुमारास धानोरीतील लोटस ग्रेस सोसायटी कमलपार्क लेनक्रमांक ११ मध्ये घडली आहे. याप्रकरणी महिलेने विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिक्षा केंद्रात बोगस विद्यार्थ्याला अटक – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला कुटूंबियासह धानोरीत राहायला असून, ३१ जानेवारीला सकाळच्या सुमारास महिला बाहेर गेली होती. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील १० लाख ८० हजारांचे दागिने चोरून नेले. बाहेरून आल्यानंतर महिलेला घरात चोरी झाल्याचे दिसून आले. त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×