Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

दूधात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

भेसळ करणाऱ्यांची माहिती देण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे – दूध भेसळीवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी शासन निर्णयानुसार अपर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली. समितीमध्ये अपर पोलीस अधिक्षक, पुणे, सहायक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन विभाग, पुणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,पुणे, उप नियत्रंक वैध मापन शास्त्र पुण हे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी हे सदस्य सचिव आहेत. दूधात भेसळ करणाऱ्या व्यक्ती, डेअरी याची माहिती समितीकडे देण्यात यावी असे आवाहन समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

थकीत मेंटेनन्स मागितला चेअरमन च्या डोक्यात दगड घातला – सविस्तर बातमी

दूध हे दैनंदिन आहाराचा एक आवश्यक भाग असल्याने महत्वपूर्ण पोषक तत्वांचा स्रोत असून चांगले आरोग्य राखण्यास महत्वपुर्ण भूमिका बजावते. तथापि हाणीकारक पदार्थांसह दुधात भेसळ केल्याने ग्राहकांच्या हिताला मोठा धोका निर्माण होतो. दुध भेसळीच्या सामान्य प्रकारामध्ये पाणी, क्रीम मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च, युरिया, डिटर्जंटस आणि इतर रसायनांचा समावेश करतात. हे भेसळ करणारे केवळ दुधाच्या पौष्टीक मुल्याशी तडजोड करीत नाहीत. तर मानवी शारिरीक समस्या, पचन, अँलर्जी आणि दीर्घकालीन अवयवांचे नुकसान यासारख्या गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात. या समस्याचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी ग्राहक, सरकारी संस्था, दुग्ध उद्योगाचे भागधारक आणि नियामक संस्था यांनी एकत्रपणे काम करणे अत्यंत आवश्यक आहे.

जिल्ह्यातील दूध संकलन स्विकृती केंद्र, जिल्ह्याबाहेरील परराज्यांतून येणाऱ्या दुधाचे नमुने तसेच सहकारी व खाजगी क्षेत्रातील दूध संकलन व प्रक्रिया केंद्रावरील (डेअरी) नमुने यांची तपासणीसाठी सहायक आयुक्त (अन), अन्न औषध प्रशासन विभाग, पुणे विभागाकडील अन्न सुरक्षा यांना दरमहा उद्दीष्ठ ठरवून देण्यात आले आहे. दुध व दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती, डेअरी विरोधात प्रथम खबरी अहवाल गुन्हा नोंदवून भेसळ केल्याचे आढळून आलेल्या कसूरदारांवर कठोर फौजदारी कारवाई करण्यात येईल.

दूध भेसळीबाबत माहिती देण्यासाठी

1800222365 हा टोल फ्री क्रमांक व EMAIL ID.:- FDAPUNE2019@GMAIL.COM वर तक्रार नोंदवावी. दूध भेसळीबाबत तक्रार, माहिती देण्याऱ्या व्यक्तींची माहिती पुर्णपणे गोपनिय ठेवण्यात येईल असेही समितीने प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×