Breking News
पुण्यात रुग्ण महिलेचे दागिने चोरीलामहावितरणच्या रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरीलाहुंड्यासाठी छळ केल्याने महिलेची आत्महत्यापुणेकरांच्या सुरक्षेला लागलेली कीडविषारी दारू प्रकरणात ‘सीआयडी’ने मृतांचा खरा आकडा जनतेसमोर आणावापोलीस आयुक्तांचा गुन्हेगारी घटल्याचा दावाविमान अपघाताच्या पार्श्वभूमीवर रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीकडून सुरक्षा उपाय अधिक कडकविषारी दारू प्रकरणात मृतांचा खरा आकडा समोर आणण्यासाठी विशेष प्रयत्न गरजेचेसोशल मीडियावरील जनगणनेच्या अफवांपासून सावध राहा : आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशीपीएमपील बस प्रवासात जेष्ठेची सोन्याची बांगडी चोरीला

पुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

पुण्यात अडीच हजार बेशिस्त दुचाकीस्वारांंविरुद्ध कारवाईच्या जाळ्यात

२९ लाखांहून अधिक दंड वसूल; समुपदेशनाद्वारे शिस्तीचे धडे

marathinews24.com

पुणे – शहरात बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे होणारे गंभीर रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. विरुद्ध दिशेने जाणारे, ट्रिपल सीट अशा प्रकारचे नियमभंग करणाऱ्या अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली. नियमभंग करणाऱ्या दुचाकीस्वारांविरुद्ध पोलिसांनी मंगळवारी कारवाईचा बडगा उगारला. वाहतूक शाखेसह स्थानिक पोलीस ठाण्यातील पथके या कारवाईत सहभागी झाली होती. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. दिवसभरात अडीच हजार दुचाकीस्वारांविरुद्ध कारवाई केली असून, त्यांच्याकडून २९ लाख ३८ हजार ४५० रुपये दंड वसूल केला’, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक – सविस्तर बातमी 

‘पोलिसांनी शहरातील वेगवेगळ्या भागात कारवाई करुन दुचाकी जप्त केल्या. दुचाकीच्या कागदपत्रांची पूर्तता, तसेच थकीत दंड वसूल करण्यात आल्यानंतर दुचाकी ताब्यात देण्यात आला. या कारवाई आणि दुचाकीस्वारांना नियमभंग केल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव या कारवाईच्या माध्यमातून झाली. कर्णकर्कश हाॅर्न, तसेच सायलेन्सरमध्ये फेरफार करुन विक्री करणाऱ्या वारजे भागातील दुकानदारांविरुद्ध कारवाई करण्यात आली’, असे पाटील यांनी नमूद केले.

भरधाव दुचाकी चालविणे, एकाच दुचाकीवरुन तिघांचा प्रवास (ट्रिपल सीट), विरुद्ध दिशेने जाणे (राँग साईड) अशा प्रकारचे नियमभंग करण्याचे प्रकार वाढले आहे. बेशिस्त दुचाकीस्वारांमुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. भरधाव दुचाकीस्वार पादचाऱ्यांना धडक देऊन पसार झाल्याच्या घटना घडल्या आहे. दुचाकीस्वार स्वत:चा जीव धोक्यात घालतात, तसेच समोरुन येणाऱ्या वाहनचालकांना हूल देतात. त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात.

बेशिस्त वाहन चालकांचे बुधवारी शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात समुपदेशन करण्यात आले. समुपदेशनाच्या माध्यमातून वाहतूक पोलिसांनी दुचाकीस्वारांना शिस्तीचे धडे दिले. समुपदेशन कार्यक्रमात ४५० ते ५०० दुचाकीस्वार सहभागी झाले होते. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांच्यासह वाहतूक शाखेतील अधिकारी या वेळी उपस्थित होते.

बेशिस्त दुचाकीस्वारांविरुद्ध यापुढील काळात अचानक कारवाई करण्यात येणार आहेत. पोलिसांनी मंगळवारी दिवसभरात अडीच हजार दुचाकी ताब्यात घेतल्या. थकीत वाहतूक दंड, दुचाकी वाहनांच्या कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर दुचाकी टप्याटप्याने परत केल्या जाणार आहेत.

– मनोज पाटील, अतिरिक्त पोलीस आयुक्त

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×