Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

बीडमध्ये पोलीस मैदानी चाचणीच्या वेळापत्रकात मोठा बदल

बीडमध्ये पोलीस मैदानी चाचणीच्या वेळापत्रकात मोठा बदल

पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर वेळापत्रकात केला बदल

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रिया दरम्यान पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर आता बीड पोलीस भरती प्रक्रियेत मोठा बदल केला आहे.दि. ११ फेब्रुवारीपासून पोलीस दलातील १७४ पोलीस शिपाई पदांकरीता पोलीस भरती प्रक्रिया पोलीस मुख्यालय बीड येथील मैदानावर सुरु झाली आहे.

पुण्यातील वेश्या व्यावसाय प्रकरणात गुन्‍हे दाखल – सविस्तर बातमी 

बीड जिल्ह्यात सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेअंतर्गत मैदानी चाचणी दि. १२ फेब्रुवारीपासून मैदानी चाचणी सकाळी नऊ वाजेपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न राहणार आहे. ज्या उमेदवारांची मैदानी चाचणी सकाळी नऊ वाजेपर्यंत होणार नाही, अशा उमेदवारांची मैदानी चाचणी सायंकाळी पाच वाजेनंतर घेण्यात येणार आहे. तथापि, सर्व उमेदवारांची मैदानी चाचणीची पूर्व प्रक्रिया पुर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांची हजेरी नोंदणी, छाती मोजणी व उंची मोजणी ही प्रक्रिया सकाळच्या सत्रातच पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी त्यांना प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेतच पोलीस मुख्यालय येथील मैदानावर हजर राहुन मैदानी चाचणीची पूर्व तयारी करुन घेणे आवश्यक आहे.

सायंकाळच्या सत्रात उमेदवारांचा वेळ वाया जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी गोंधळून न जाता व मनात कोणतीही शंका न बाळगता प्रवेशपत्रावर दिलेल्या वेळेनुसार पोलीस मुख्यालय, बीड येथे उपस्थित राहावे, असे आवाहन बीड पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×