Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम; भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

खारघरमध्ये ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी ३५० वा शहिदी समागम; भव्य पार्किंग व्यवस्थेची तयारी

महामार्गपासूनच मार्गदर्शक फलक, कलर कोडींग नुसार पार्किंगची व्यवस्था

marathinews24.com

खारघर – अल्पसंख्यांक विकास विभाग आणि राज्यस्तरीय समागम समिती यांच्या वतीने खारघर येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी आयोजित ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम कार्यक्रमासाठी भाविकांच्या सोयीसाठी व्यापक आणि रंग-कोडनिहाय 33 ठिकाणी पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन बस, कार आणि दुचाकींसाठी स्वतंत्र जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.

विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा ओझर येथे संपन्न – सविस्तर बातमी 

प्रत्येक पार्किंग स्थळावरून कार्यक्रमाच्या ठिकाणी मोफत पिकअप आणि ड्रॉप सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे वाहन पार्क केल्यानंतर भाविकांना कार्यक्रमस्थळी पोहोचण्यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आली आहे. ओला-उबरसह सर्व टॅक्सी सेवांसाठी देखील स्वतंत्र पिकअप-ड्रॉप पॉइंट्स निश्चित करण्यात आले आहेत.

कार्यक्रमासाठी येणाऱ्या वाहनांची गर्दी टाळण्यासाठी ‘ब्ल्यू’, ‘ऑरेंज’ आणि ‘पिंक’ अशा तीन रंगांमध्ये पार्किंगचे वर्गीकरण करण्यात आले आहे. प्रत्येक रंगानुसार विशिष्ट मार्ग व जिल्हे निश्चित करण्यात आले असून, त्यानुसार वाहनचालकांना पार्किंग स्थळी मार्गदर्शन केले जाणार आहे.

ब्ल्यू पार्किंग (नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर आदी मार्गे येणाऱ्या वाहनांसाठी)
ओवे कॅम्प मैदान, इनामपुरी क्रिकेट मैदान, श्री सत्य साई हॉस्पिटल परिसर, मेट्रो स्टेशनजवळील मैदाने आदी ठिकाणी बस व कार पार्किंगची सोय करण्यात आली आहे. या विभागात सुमारे ५५० बसेस आणि ११३५ कार पार्किंगची क्षमता उपलब्ध आहे.

*ऑरेंज पार्किंग (रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आदी जिल्ह्यांतून येणाऱ्या वाहनांसाठी)*
पापडीचा पाडा सर्कल, सेक्टर ३५ ई, सेक्टर ३३, ३२, २७ आणि २३ मधील विविध मैदाने येथे मोठ्या प्रमाणावर पार्किंगची व्यवस्था आहे. या विभागात ४०० बसेस आणि तब्बल ४९९० कार पार्किंगची क्षमता उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पिंक पार्किंग (मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर येथून येणाऱ्या वाहनांसाठी)
सेक्टर २४, १४, ११, १६, ७, ४, ८ आणि १० मधील मैदाने तसेच लिटल वर्ल्ड मॉल परिसर येथे वाहनतळ निश्चित करण्यात आले आहेत. या विभागात २०० बसेस आणि २५६० कार पार्किंगची सुविधा आहे. याशिवाय, कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी नियुक्त पोलिस व शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी सेंट्रल पार्क, सेक्टर ६ परिसर आणि गुरुद्वारामागील टनेल रोड येथे स्वतंत्र पार्किंग राखीव ठेवण्यात आले आहे. येथे सुमारे १४५० कार आणि १००० मोटारसायकली उभ्या करण्याची क्षमता आहे.

महामार्गपासून मार्गदर्शक फलक

कार्यक्रमादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविकांना सुलभ प्रवेश मिळावा यासाठी प्रशासनकडून मार्गदर्शक फलक, स्वयंसेवक आणि पोलीस बंदोबस्ताचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. आयोजकांनी भाविकांनी दिलेल्या रंग-कोडनुसार पार्किंगचा वापर करावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.

वाहतूक व्यवस्था व पार्किंग व्यवस्थेबद्दल नवी मुंबई वाहतूक शाखेचे उपायुक्त (वाहतूक ) तिरुपती काकडे यांनी सांगितले की, खारघर येथे ‘हिंद दी चादर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या परिसरामध्ये जवळपास 33 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रत्येक पार्किंगच्या ठिकाणी पिकअप आणि ड्रॉप सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे; म्हणजे, ज्या ठिकाणी पार्किंगमध्ये आपण वाहन लावाल, तिथून कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी मोफत पिकअप आणि ड्रॉपची सोय करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर, या ठिकाणी येणारे ओला, उबर आणि टॅक्सी यांच्यासाठीसुद्धा पिकअप आणि ड्रॉपची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च या दोन्ही दिवशी सकाळी 6:00 वाजल्यापासून ते रात्री 11:00 वाजेपर्यंत नवी मुंबईच्या आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रामध्ये जड आणि वाजड वाहनांना प्रवेश करण्यास आणि पार्किंग करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे.

त्याचबरोबर, खारघरमध्येसुद्धा वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून, काही ठिकाणी रस्ते, पर्यायी रस्ते निर्माण केलेले आहेत आणि काही रस्त्यांवरती वाहतूक प्रतिबंधित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने येणाऱ्या भाविकांना आणि नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून, वाहतूक शाखेकडून एक डीसीपी, एक एसीपी, 20 अधिकारी आणि 500 अंमलदार यांच्यासोबत 500 वार्डन नेमण्यात आलेले आहेत; ज्यामुळे वाहतूक जी आहे, ती सुव्यवस्थित राखण्यासाठी मदत होईल.

काही ठिकाणी वाहनं बंद पडण्याची संभावना लक्षात घेता, पुरेसा प्रमाणात क्रेन नेमण्यात आलेले आहेत. टोइंग व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सर्व पार्किंगच्या वाहनतळाकडे जाणाऱ्या रस्त्यावरती आणि कार्यक्रमाच्या ठिकाणी येणाऱ्या रस्त्यावरती सर्वत्र साइन बोर्ड्स लावण्यात आलेले आहेत. एकंदरीत, या कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी सर्व प्रकारची वाहतूक व्यवस्था अबाधित राहील यासाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही, यासाठी वाहतूक पोलीस आणि नवी मुंबई पोलीस सज्ज आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×