Breking News
विमानात बाँम्ब ठेवल्याची धमकीडोक्यात वीट पडल्याने बांधकाम मजुराचा मृत्यू१ लाखांची लाच प्रकरणी ग्राम महसूल अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हाहडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्न

पुण्यात दुचाकीस्वार चोरट्यांचा धुडगूस सुरूच, पोलीसही हतबल

खराडीसह विमाननगरमध्ये महिलांचे दागिने हिसकावले

महमंदवाडीत भरदिवसा महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

marathinews24.com

पुणे – शहरातील विविध भागात दुचाकीस्वार सोनसाखळी चोरट्यांनी धुडगूस घातला असून, पोलिसांसमोर आव्हान निर्माण केले आहे. दरदिवशी या ना त्या भागातील महिलांना टारगेट करुन दागिने हिसकावून नेले जात आहेत. याकडे मात्र स्थानिक पोलिसांना लक्ष द्यायला वेळच नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे चोरट्यांचे फावले आहे. चक्क दिवसाढवळ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून नेण्यापर्यंत चोरट्यांची मजल वाढली आहे. त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

आयपीएल सट्टा, रेसकोर्स गुंंतवणुकीवर दाखवले करोडोंचे आमिष – सविस्तर बातमी 

कामावर जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबलेल्या महिलेजवळ येउन दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील ६० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना २२ एप्रिलला सकाळी सव्वा नउच्या सुमारास महमंदवाडीतील रहेजा व्हिस्टा फेज तीनमध्ये घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय महिलेने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दुचाकीस्वार दोघा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपासाला गती दिली आहे. आजूबाजूच्या सीसीटीव्ही फुटेजनुसार चोरट्यांचा माग काढला जात असल्याची माहिती काळेपडळ पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे तपास करीत आहेत.

पीएमपीएल बसप्रवासात अडीच लाखांचे दागिने चोरले

पुणे-गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने पीएमपीएल बसप्रवास करणार्‍या महिलेच्या पिशवीतून तब्बल २ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ही घटना २१ एप्रिलला सकाळी सव्वा अकराच्या सुमारास बालाजीनगर ते सिटीप्राईड चौकादरम्यान प्रवासात घडली आहे. याप्रकरणी महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार महिलेची आई बसप्रवास करीत असताना चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतून दागिन्यांची चोरी केली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पवार तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×