ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची यशदाला सदिच्छा भेट
marathinew24.com
पुणे – ग्रामविकास तथा पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रीय पंचायत राज दिनानिमित्त यशदा येथे आयोजित कार्यक्रमास भेट दिली. भारतीय संविधानातील ७३ व्या घटना दुरुस्तीचे स्मरण म्हणून हा दिवस साजरा करण्यात येत असून या घटना दुरुस्तीमुळे ग्रामविकासाला नवी दिशा व ग्रामीण विकासाला चालना मिळाली असल्याचे गोरे यांनी सांगितले. यावेळी यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, उपमहासंचालक पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, राज्य ग्रामीण विकास संस्थेचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पंचायत राज संचालक गिरीश भालेराव उपस्थित होते.
धनगराच्या पोराची थेट आयपीएस पदाला गवसणी – सविस्तर बातमी
राष्ट्रीय पंचायत दिनानिमित्त शुभेच्छा देऊन गोरे म्हणाले, यशदा ही देशाला दिशा देणारी संस्था आहे. या संस्थेतून प्रशिक्षण घेतलेले अधिकारी सर्वोच्च पदावर काम करत आहेत. शासन विविध योजनांद्वारे ग्रामविकासाला चालना देत असून ग्रामविकास विभागाकडून समृद्ध ग्राम योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेची संकल्पपूर्ती अंतिम टप्प्यात आहे. प्रारंभी गोरे यांनी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. तसेच २६ व २७ एप्रिलला होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यशाळेच्या तयारीची पाहणी केली.