जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर महिलांसाठीचा रोजगार मेळावा संपन्न

विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये मुली आणि महिला उमेदवारांची प्राथमिक निवड

marathinews24.com

पुणे – जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. सुशिक्षित बेरोजगार मुली आणि महिलांना खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आयोजित मेळाव्यात ५३ महिला उमेदवारांनी सहभाग नोंदवला असून विविध नामांकित औद्योगिक कंपन्यांमध्ये मुली आणि महिला उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची बिनविरोध निवड-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी – सविस्तर बातमी

जागतिक महिला दिनाच्या औचित्य साधून आयोजित या मेळाव्यात दहावी उत्तीर्ण,बारावी उत्तीर्ण, आयटीआय, पदविका व पदवीधर अशा विविध शैक्षणिक पात्रता धारक महिलांनी उमेदवारांनी ट्रेनी ऑपरेटर, क्षेत्र अधिकारी अशा विविध पदांसाठीच्या रिक्त पदांसाठी मुलाखती दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशस्वी एज्युकेशन सोसायटी सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ.शिवाजी मुंढे होते. जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे मार्गदर्शन अधिकारी सचिन ढेरे, सुनिल नाळे यांच्यासह यशस्वी संस्थेचे प्रमुख मनुष्यबळ व्यवस्थापक श्रीकांत मिरजकर, विभाग प्रमुख नितीन थेटे यासह औद्योगिक कंपन्यांच्या मनुष्यबळ व्यवस्थापन विभागातील पदाधिकारी उपस्थित होते.

डॉ. मुंढे म्हणाले, औद्योगिक कंपन्यांमध्ये उपलब्ध असलेल्या रोजगार संधींची माहिती घ्यावी. स्वतःचे करिअर घडवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.

विभागाच्या विविध उपक्रमाविषयी सविस्तर माहिती देऊन श्री नाळे म्हणाले,
www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर 18 हजाराहून अधिक नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत. या संकेतस्थळावर इच्छुकांनी मोफत नाव नोंदणी करावे. अधिक माहितीसाठी 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही श्री. नाळे म्हणाले.

यावेळी चाकण, भोसरी, तळेगाव, पिंपरी चिंचवड, हिंजवडी, हडपसर परिसरातील नामांकित औद्योगिक कंपन्यांमधील 410 रिक्त पदांच्या रोजगार संधीसाठी मुलाखती घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त सुरेश वराडे यांनी दिली आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×