Breking News
Wagholi Traffic News : वाघोली-लोहगाव चौक रस्त्यावर एकेरी वाहतूकPune Road Accident News : पुण्यात वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यूSavitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत

पुण्यात पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य

पुण्यात पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य

वाहक गजाआड

marathinews24.com

पुणे – पीएमपी प्रवासी युवतीशी अश्लील कृत्य करणाऱ्या वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या आईने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपीविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे विमानतळावर २६ कोटी ८० लाखांचा ‘हायड्रोपोनिक गांजा’ जप्त – सविस्तर बातमी  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती अल्पवयीन आहे. ती २८ मार्च रोजी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा पीएमपी वाहक (कंडक्टर) आहे. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला. तिने नकार दिल्यानंतर स्पर्श करुन विनयभंग केला. युवतीने आरडा ओरडा केला. प्रवाशांनी बस थांबविली. युवतीकडे विचारणा केल्यानंतर वाहक शेख याने तिचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला. शेखला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

अश्लील कृत्य प्रकरणी ज्येष्ठाविरुद्ध गुन्हा

पुणे – अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य केल्या प्रकरणी एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी एका ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियमान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहायला आहे. तक्रारदार महिलेच्या दहा वर्षांच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला. ही बाब तिने आईला सांगितले. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक माधुरी काजळे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×