Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेतीशाळा

एप्रिल २०२६ मध्ये विशेष डिजिटल शेतीशाळा

शेतकऱ्यांना सहभागी होण्याचे आवाहन

marathinews24.com

पुणे –  हवामानातील वाढती अनिश्चितता, पावसाचा खंड व नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतीसमोरील आव्हाने लक्षात घेऊन कृषी विभागामार्फत ‘हवामान अनुकूल तंत्रज्ञान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एप्रिल २०२६ मध्ये चार विशेष डिजिटल शेतीशाळांचे आयोजन करण्यात आले आहे.

दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा उमेदवारी अर्ज दाखल – सविस्तर बातमी 

या शेतीशाळांद्वारे पेरणीपूर्व तंत्रज्ञान, जैविक व नैसर्गिक निविष्ठा, एकात्मिक कीड व्यवस्थापन तसेच भात शेतीतील सुधारित तंत्रज्ञान याबाबत तज्ञ मार्गदर्शन मिळणार आहे. या शेतीशाळेमध्ये कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे व प्रगतशील शेतकरी यांचा सहभाग राहणार आहे.

पहिल्या दोन शेतीशाळा १ व ८ एप्रिल रोजी ऑनलाइन उपलब्ध असून, तिसरी व चौथी शेतीशाळा अनुक्रमे १५ व २२ एप्रिल रोजी सायंकाळी ७.३० वाजता थेट प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पाणी फाउंडेशन आणि उमेदच्या यु-ट्युब चॅनेलवर केल्या जाणार आहेत.

या कार्यशाळेस शेतकरी, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्या, कृषी मंडळे तसेच इच्छुक नागरिकांनी या डिजिटल शेतीशाळांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी संजय काचोळे यांनी केले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×