Breking News
केतनच्या खुनासाठी गुगल गुरू, लोहगड मर्डर मिस्ट्रीराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम २८ जून रोजीपुलं म्हणजे आनंददायी ऊर्जा-पंडित सुरेश तळवलकरआषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसई-स्पोर्ट्स धोरणात सायबर बुलिंग, व्यसनाधीनता, अंमलबजावणी यंत्रणेचा समावेश आवश्यक – डॉ. नीलम गोऱ्हेसंत तुकाराम महाराज पालखी मार्गाची उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्याकडून पूर्वपाहणीविशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (एसआयआर) बाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक संपन्नकौटुंबिक वादातून महिलेचा खूनकेतन अगरवाल खूनाचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवावामौजमजेसाठी दुचाकी चोरी करणारा जेरबंद

पुण्यात नक्षलवादी कमांडर हिडमा माडवीच्या गाण्यावर नाच

दोघा विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा (माओवादी) कमांडर तसेच पिपल्स लिबरेशन आर्मीचा बटालियन कमांडर हिडमा माडवी या अत्यंत धोकादायक नक्षलवाद्यावर आधारित गाण्यावर नाचणाऱ्या व गाणे निवडण्यात आघाडीवर असणाऱ्या दोघा विद्यार्थ्यांसह इतरांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना ११ एप्रिलला विश्रांतवाडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील सांस्कृतिक कार्यक्रमात घडली होती. याप्रकरणी किरण नारायण गोमासे (वय २२, रा. देवली, ता. अहेरी, जि. गडचिरोली) आणि श्रीनिवास हनुमंत कुमरी (वय २३, रा. झिंगापूर, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली) यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम १९७ (१) (घ), ३५३ (१), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस कर्मचारी शब्बीर बाबा शेख (वय ३१) यांनी तक्रार दिली आहे.

पुण्यात एमडी ड्रग्जची विक्री रॅकेट उघडकीस – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ६ एप्रिल ते १४ एप्रिल या कालावधीत वसतिगृहाच्या मैदानावर क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसह अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ११ एप्रिलच्या कार्यक्रमात वाडिया महाविद्यालयात बीबीएचे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी हिडमा माडवी धोकादायक आणि प्रसिद्ध अशा नक्षलवाद्यावर आधारित गाण्यावर नृत्य करून देशाची सार्वभौमता, एकात्मता व अखंडता धोक्यात येईल तसेच अन्यायकारक व दिशाभूल करणारी माहिती तयार केले. तसेच ते गाणे प्रसारित केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी तपास करून दोघा विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×