Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ५९ सेकंदांचा ‘तो’ व्हिडिओ ठरणार महत्त्वाचा पुरावा

"सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी १७ जूनला

पुढील सुनावणी आता ७ मे रोजी होणार

marathinews24.com

बीड (अनंत जाधव) – मस्साजोग गावचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी दि.२२ एप्रिल रोजी बीडच्या विशेष मकोका कोर्टात पार पडली. सुनावणीदरम्यान आरोपींची उपस्थिती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावण्यात आली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ७ मे रोजी होणार असून, कोर्टातील घडामोडींसोबतच धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी साधलेला संवाद चर्चेचा विषय ठरत आहे. सुनावणीदरम्यान आरोपी विष्णू चाटे याच्यावतीने कोर्टात ‘जीपीए’ साठी अर्ज दाखल केला आहे. गाडीचे हप्ते भरणे आणि लोकांची देणी देण्यासाठी बँक खात्यातील व्यवहारांचे अधिकार मिळावेत, अशी मागणी आरोपीने केली आहे. यावर फिर्यादी पक्षाच्या वतीने पुढील सुनावणीत म्हणणे मांडले जाणार आहे. प्रकरणातील महत्त्वाचा तांत्रिक पुरावा असलेल्या पेन ड्राईव्हमधील ५९ सेकंदांच्या फाईलबाबतही कोर्टात चर्चा झाली. लॅपटॉपमधून जो डेटा रिकव्हर झाला आहे, तोच पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाईल, असे लेखी स्वरूपात देण्यात आले आहे.

वरिष्ठ शास्त्रज्ञ असल्याच्या बतावणीने महिलांची फसवणूक करणारा अटकेत – सविस्तर बातमी 

मात्र, आरोपींचे वकील मुद्दाम खोडा घालून तारीख लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला.
राजकारण दुय्यम, भावाला न्याय मिळवून देणे हेच ध्येय एकीकडे मस्साजोगमध्ये सरपंच पदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना, धनंजय देशमुख यांनी प्रचार सोडून कोर्टातील सुनावणीला उपस्थित राहणे पसंत केले. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, माझ्यासाठी राजकारण दुय्यम असून भावाला आणि गावाला न्याय मिळवून देणे हीच माझी प्राथमिकता आहे. मला राजकारण करायचे असते, तर मी स्वतः निवडणुकीला उभा राहिलो असतो. या सुनावणीमुळे आणि देशमुखांच्या राजकीय भूमिकेमुळे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष आता ७ मे च्या सुनावणीकडे आणि २८ तारखेच्या निकालाकडे लागले आहे.

स्वरूपानंद देशमुख यांच्यावर टीका

निवडणुकीच्या रिंगणात असलेले स्वरूपानंद देशमुख यांच्यावर भाष्य करताना धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले की, त्यांच्या बोलण्याकडे मी लक्ष देत नाही. माझ्या कुटुंबावर कोणीही बोलण्याचा प्रयत्न करू नये. माझ्या भावाने दलित बांधवांसाठी प्राणाची आहुती दिली आहे. पीडित कुटुंबाबद्दल बोलणे हे कितपत उचित आहे, याचे भान ज्याला त्याला असले पाहिजे, असेही ते म्हणाले.

२९ तारखेला मोठा खुलासा ?

निवडणुकीत स्वरूपानंद देशमुख यांना नक्की कोणी उभे केले आणि त्यांना कोणाचा पाठिंबा आहे, याचे सर्व स्पष्टीकरण २८ तारखेच्या मतदानानंतर म्हणजेच २९ एप्रिल रोजी देणार असल्याचे संकेत धनंजय देशमुख यांनी दिले आहेत. येणाऱ्या ८-१० दिवसांत सर्व उत्तरे मिळतील, सध्या यावर जास्त चर्चा करणे उचित नाही, असे म्हणत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×