Breking News
पर्वती परिसरात चिमुरडीवर अत्याचाराचा प्रयत्न, नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळलानवले पूल परिसरात आंदोलनाला बंदीकात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्यहडपसरमध्ये बेड्यासह आरोपीचा पळून जाण्याचा प्रयत्न फसलाभिंतीत अडकलेल्या मुलाची अग्निशमन दलाने केली सुटकाकोथरूडमध्ये दूरसंचार विभागाची केबल चोरीलापुणे जिल्ह्यात सफाई कर्मचाऱ्यांसाठी मॉडेल स्वरुपात दिशादर्शक काम करावेभारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शनाचे ७ ते ९ मे कालावधीत पुण्यात आयोजनटेम्पो चोरणार्‍या सराईतांना अटक, युनीट सहाची कामगिरीजुन्या वादातून तरूणाचा केला खून, चार अल्पवयीन ताब्यात

नवले पूल परिसरात आंदोलनाला बंदी

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांचे आदेश

marathinews24.com

पुणे – बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश दिले.
नसरापूर अत्याचार प्रकरणानंतर संतप्त नागरिकांनी मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्गावरील नवले पूल परिसरात शनिवारी (२ मे) सायंकाली आंदोलन केले. आंदाेलनात सहभागी झालेल्या नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी करून चार तास या भागात रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलनामुळे भागातील वाहतूक ठप्प झाली होती. मुंबई, तसेच साताऱ्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. वाहनांची रांग पंधरा किलोमीटरपर्यंत गेली होती. वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका, प्रवासी, मालवाहू वाहने अडकून पडली होती. नागरिक, तसेच प्रवाशांनी याबाबतची तक्रार पोलीस नियंत्रण कक्षाकडे केली होती. या घटनेनंतर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी घटनास्थळी धाव घेऊन आंदोलकांशी संवाद साधला.

कात्रज–कोंढवा मार्गावरील कोंडी कमी करण्यासाठी प्राधान्य – सविस्तर बातमी

‘आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार आहे. या प्रकरणाच्या तपासावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीने लक्ष ठेवले आहे. पीडित बालिका, तसेच तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी पोलीस कटीबद्ध आहेत’, असे त्यांनी सांगितले. अखेर चार तासानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. रात्री साडेदहानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. दरम्यान, काही जण नवले पूल परिसरातून जाण्यास तयार नव्हते. पोलिसांनी त्यांची समजूत घातली. सैाम्य बळाचा वापर पोलिसांना करावा लागला. त्यानंतर या भागातील वाहतूक सुरळीत झाली. यापार्श्वभूमीवर बाह्यवळण मार्ग, तसेच नवले पूल परिसरात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

याबाबत पोलीस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, ‘ मुंबई-बेंगळुरू बाह्यवळण मार्ग हा महत्त्वाचा आहे. कायदा आणि सुव्यवस्था, तसेच वाहतूक विचारात घेऊन या भागात आंदोलन करण्यास मनाई करण्यात आली आहे. यापुढील काळात नवले पूल परिसरात आंदोलन केल्यास पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलिसांचे आदेश धुडकाविल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येतील

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×