Breking News
विशेष वृत्त – साथी पोर्टल: बियाण्यांच्या पारदर्शकता, गुणवत्ता व विश्वासार्हतेकडे डिजिटल पाऊलदुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूबंगल्यातून २७ लाखांचे दागिने लंपास‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील शिवराज मोटेगावकर यांची चौकशी‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात मनीषा मांढरेला ‘सीबीआय’ कोठडीदगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट’ला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जापैशाच्या वादातून वडिलांनीच मुलावर अ‍ॅसिड फेकलेपुढील वर्षापासून ‘पुणे कृषी नवसंकल्पना स्पर्धा’ राज्यव्यापी; प्रथम पुरस्कार दिवंगत अजित पवार यांच्या नावाने देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयेवलेवाडी परिसरात चिमुरडीवर अत्याचारपुणे महानगरपालिकेच्या विविध प्रकल्पांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण

पुण्यात रंगणार सहावा सुपरहिट ‘मराठी फिल्म फेस्टिव्हल’!

२२ ते २४ मे दरम्यान रंगणार मराठी चित्रपटांचा सांस्कृतिक जल्लोष

marathinews24.com

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील वैविध्यपूर्ण कथा, नव्या विचारांची मांडणी आणि सर्जनशीलतेचा उत्सव इत्यादी साजरा करणारा लोकप्रिय मराठी फिल्म फेस्टिव्हल यंदा पुन्हा एकदा पुण्यात रंगणार आहे. या महोत्सवाचे ६वे पर्व २२ ते २४ मे २०२६ दरम्यान पार पडणार असून, मराठी सिनेमाविश्वातील अनेक मान्यवर कलाकार, दिग्दर्शक आणि सिनेरसिक या सोहळ्याला उपस्थित राहाणार आहेत.

संजय दराडे पुण्याचे नवे सह पोलिस आयुक्त – सविस्तर बातमी

गेल्या पाच पर्वांमध्ये या फिल्म फेस्टिव्हलने महाराष्ट्रातील चित्रपटप्रेमींमध्ये विशेष स्थान निर्माण केले आहे. मराठी सिनेमाचा समृद्ध वारसा, बदलत्या काळातील कथा आणि प्रादेशिक कथनशैलीतील नव्या प्रयोगांना व्यासपीठ देणारा हा महोत्सव आता राज्यातील महत्त्वाच्या सिनेमोत्सवांपैकी एक मानला जातो.

यंदाच्या महोत्सवात समकालीन चित्रपटांसोबतच काही अजरामर क्लासिक चित्रपटांचे विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये ‘जैत रे जैत’, ‘तिघी’’, ‘गोंधळ’ आणि ‘दशावतार’ या चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय विविध पॅनल डिस्कशन्स, दिग्दर्शक आणि कलाकारांशी संवाद तसेच प्रादेशिक कथाकथनाच्या बदलत्या प्रवाहांवर विशेष चर्चासत्रेही आयोजित करण्यात येणार आहेत.

या सोहळ्यात महेश मांजरेकर, अमृता सुभाष, गिरीश कुलकर्णी, शिवराज वायचळ, सिद्धार्थ जाधव यांच्यासह मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे.

यंदाच्या महोत्सवातील विशेष आकर्षण ठरणार आहे ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना प्रदान करण्यात येणारा ‘लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड’. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत पाच दशकांहून अधिक काळ दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

उदयोन्मुख दिग्दर्शक आणि नव्या पिढीतील कथाकथनाला प्रोत्साहन देण्यासाठी शॉर्ट फिल्म स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमासाठी फिल्म क्रिटिक्स गिल्ड आणि प्रसिद्ध चित्रपट समीक्षक अनुपमा चोप्रा यांचे सहकार्य लाभले आहे.

याबाबत बोलताना रेड एफएमच्या संचालिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निशा नारायणन म्हणाल्या, ‘’प्रादेशिक कथा अधिक मोठ्या सांस्कृतिक व्यासपीठावर पोहोचायला हव्यात, असा आमचा कायम विश्वास राहिला आहे. मराठी सिनेमातील सर्जनशीलतेचा गौरव करत नव्या कथांना व्यासपीठ मिळवून देण्याचा हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. एका स्क्रीनपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक स्क्रीन्स आणि विविध फॉरमॅट्सपर्यंत पोहोचला आहे. नव्या पिढीतील दिग्दर्शक आणि कथाकारांना प्रोत्साहन देतानाच प्रादेशिक कथाकथनाची ताकद साजरी करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’’

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top
×