विमानतळ पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – क्रिप्टो करन्सी देण्याच्या बहाण्याने तरुणाला बोलावून मारहाण करत रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी लुटणाऱ्या आरोपीला विमानतळ पोलिसांनी अटक केली. त्याच्या कडून 1 लाख 65 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. प्रणय अमर बुवा (वय 19, रा. धानोरी, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही घटना 11 मे रोजी विमानतळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
पुण्यात ड्रग्जचा साठा जप्त; राजस्थानातील दोघांना बेड्या – सविस्तर बातमी
तक्रारदार तरुणासह त्यांचा मामेभाऊ यांना आरोपी व त्याच्या साथीदारांनी विमाननगर परिसरातील झिरकॉन सोसायटीजवळ बोलावले. त्यानंतर जबर मारहाण करून त्यांच्याकडील 1 लाख 40 हजार रुपयांची रोख रक्कम, दोन मोबाईल आणि एक ॲक्टिव्हा दुचाकी हिसकावून नेली होती. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीकडून 25 हजार 940 रुपयांची रोख रक्कम, 90 हजार रुपयांचा कंपनीचा मोबाईल तसेच 50 हजार रुपयांची ॲक्टिव्हा दुचाकी असा एकूण 1 लाख 65 हजार 940 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोविंद जाधव, पोलिस निरीक्षक महेश बोलके, पोलिस उपनिरीक्षक नितीन राठोड, अमंलदार लालु कऱ्हे, रूपेश पिसाळ, अकुंश जोगदंडे, राहुल जोशी, योगेश थोपटे यांच्या पथकाने केली.





















