१८०० कोटींच्या वादग्रस्त जमीन व्यवहारात दिग्विजय पाटील यांच्यावर दोषारोप
marathinews24.com
पुणे – बहुचर्चित मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर आली असून शीतल तेजवानी हिच्यानंतर आता अमेडिया कंपनीचे भागधारक आणि पार्थ पवार यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांच्याविरोधातही पुणे पोलिसांनी पुरवणी नुकताच (15 दिवसांपूर्वी) पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे.
रूग्णालयय बॉम्ब प्रकरणात आरोपीला 22 मेपर्यंत पोलिस कोठडी – सविस्तर बातमी
सुरुवातीला दाखल करण्यात आलेल्या मुख्य आरोपपत्रात दिग्विजय पाटील याचे नाव नव्हते. मात्र तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या दस्तऐवज आणि पुराव्यांच्या आधारे पुणे पोलिसांनी त्याला या प्रकरणातील क्रमांक दोनचा आरोपी म्हणून समाविष्ट केले आहे. शासकीय जमीन परस्पर खरेदी आणि संबंधित व्यवहारातील अनियमिततेबाबत त्यांच्यावर दोषारोप ठेवण्यात आले आहेत.
अमेडिया कंपनीतील सहभाग दिग्विजय पाटील हा अमेडिया कंपनीचा भागधारक आहेत. या व्यवहाराशी संबंधित दस्तऐवजांवर कंपनीच्या वतीने त्याची स्वाक्षरी आढळल्याचं तपासात समोर आले होते. याच आधारे पोलिसांनी त्याच्याविरोधातही आरोपपत्र दाखल केले आहे. या प्रकरणातील आणखी एक प्रमुख आरोपी शीतल तेजवानीला गेल्या महिन्यात जामीन मंजूर झाला आहे .
नेमकं मुंढवा जमीन प्रकरण काय?
पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील सुमारे 40 एकर जमीन या प्रकरणाच्या केंद्रस्थानी आहे. 1819 मध्ये ही जमीन महार वतन म्हणून देण्यात आली होती. नंतर 1957 मध्ये ती सरकारकडे आली आणि 1962 मध्ये भारतीय वनस्पती सर्वेक्षण केंद्रासाठी भाडेतत्त्वावर देण्यात आली. या जमिनीपैकी फक्त 3 एकरांवर केंद्राचे कामकाज होते, तर उर्वरित भाग जंगल स्वरूपात होता.
सन 2006 मध्ये वतनदारांकडून शीतल तेजवानी हिला पॉवर ऑफ अटर्नी देण्यात आली. त्यानंतर ही जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडे हस्तांतरित करण्यात आली. सध्याच्या बाजारभावानुसार या जमिनीची किंमत सुमारे 1800 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जाते. मात्र व्यवहार केवळ 300 कोटी रुपयांत झाल्याचा आरोप आहे. याशिवाय सुमारे 21 कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्कही माफ करण्यात आल्याने या व्यवहारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. नुकताच पाटील याच्यावर हे 180 पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.





















