Breking News
बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा लढा तीव्र; राहुल डंबाळे यांचे उद्यापासून उपोषणप्रेम प्रकरणातून संगणक अभियंता तरुणीची आत्महत्याडीजे-लेझरला फाटा देत आरोग्यदायी गणेशोत्सव साजरा करा!सासवड रस्त्यावर पादचाऱ्याचा मृत्यूनामदार करंडकच्या चौथ्या पर्वाची दिमाखदार सांगता; पुढील वर्षी प्रथम पारितोषिक तीन लाख रुपये; सहभागी सोसायट्यांना २५ हजार प्रोत्साहपर देण्याची चंद्रकांतदादा पाटील यांची घोषणा‘बाल्यावस्थेतील प्रारंभिक विकास’ विषयावरील कार्यशाळेचे मुख्य सचिव राजेशकुमार अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटनराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पुण्यात क्रीडा जागृती प्रभातफेरीऔषध निर्मिती कंपनीत नोकरीच्या आमिषाने ४ लाखांची फसवणूकविश्रांतवाडीत कौटुंबिक वादातून मुलाकडून आईचा खूनपुणे जिल्ह्यातही ‘प्लाझ्मा’, ‘लेझर’ झोतांवर बंदी

निर्यात वाढीसाठी मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करा – अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत

जिल्हा निर्यात प्रचालन समितीची बैठक संपन्न

marathinews24.com

पुणे – जिल्ह्यातील उत्पादनांची निर्यात वाढविण्याच्या दृष्टीने केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कार्यक्रम आणि धोरणांबाबत उद्योजकांना व्यापक माहिती मिळावी यासाठी माहिती व मार्गदर्शन कार्यक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा निर्यात प्रचालन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी परकीय व्यापार महासंचालनालयाचे जाईंट डीजीएफटी बिश्वास बी.एन., जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक अर्चना कोठारी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक योगेश पाटील यांच्यासह निर्यात क्षेत्राशी संबंधित विविध विभागांचे अधिकारी तसेच उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 16 स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी – सविस्तर बातमी

राऊत म्हणाले, केंद्र शासनाच्या निर्यात प्रोत्साहन मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील उत्पादनांचा विचार करता निर्यात वाढीसाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी. अधिकाधिक उद्योजक निर्यात क्षेत्रात पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. जिल्ह्यातील निर्यातदारांची माहिती संकलित करून त्यांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करावे. तसेच नव्या उद्योजकांना निर्यात प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

बैठकीत निर्यात प्रोत्साहन मोहीम तसेच ‘ट्रेड कनेक्ट ई-प्लॅटफॉर्म’ बाबत सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. डीजीएफटीकडून प्राप्त सूचनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने वेळोवेळी बैठका आयोजित करून आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. जिल्हा उद्योग केंद्राच्या व्यवस्थापिका पल्लवी वाडेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×