Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

केज तालुक्यात बेलगाव परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस

घरावरील पत्रे उडून गेले; आंब्याचे, गंजीचे मोठे नुकसान

marathinews24.com

बीड : (अनंत जाधव) – केज तालुक्यातील आरंणगाव , बेलगाव, काळेगाव, माळेवाडी परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोमवारी (दि.२५) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पावसाची घटना घडली आहे. वादळी वाऱ्यामुळे बेलगाव, आरंणगाव , केळगाव, काळेगाव , माळवाडी परिसरातील जनजीवन विस्कळीत होऊन शेतकऱ्यांच्या शेतातील आंब्याचे झाडे, बाभळीचे झाडे कोसळून पडली आहेत.

पुण्यात जेष्ठ फळविक्रेत्या महिलेला मोफत राशनचे आमिष, अडीच लाखांना लुटले – सविस्तर बातमी

जनावरांसाठी चारा ठेवलेल्या कडब्याच्या गंजीचे आणि शेतकऱ्यांचे घरावरचे पत्रे उडून एक ते दीड किलोमीटर अंतरावर जाधव जवळा शिवारात जाऊन , जनावरांसाठी निवारा केलेल्या पत्राच्या शेड आणि शेतातील इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे . या नुकसानीत बेलगाव येथील अक्षय दातार, विठ्ठल गिते, विकास दुनघव, तुकाराम दुनघव , सुरेश दातार या शेतकऱ्यांचा समावेश आहे. या झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होऊन चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे . त्यामुळे शेतकऱ्यांच्या भरपाई नुकसान देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

बेलगाव, केळगाव परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने आमचे आणि शेजारच्या शेतकर्यांचे आंब्याचे झाडाचे व घरावरील पत्रे उडून गेल्याने प्रचंड नुकसान झाले आहे.तरी प्रशासनाने तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.

अक्षय दातार, शेतकरी बेलगाव (ता.केज)

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×