Breking News
हडपसरमधील गावठी दारु धंद्याकडे पोलिसांचे दुर्लक्षआयुर्वेदामध्ये व्याधींचे मूळ शोधण्याची क्षमता- प्रा. डाॅ. मेधा कुलकर्णीबारामती बसस्थानक राज्यात प्रथम; ‘स्वच्छ सुंदर बसस्थानक’ अभियानात १ कोटींचे पारितोषिकजनगणना वेळेत पूर्ण होण्याकरिता प्रगणकास सहकार्य करावे‘विषारी दारु पिल्यामुळे १६ जणांचा मृत्यूमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या डिझेल बचतीच्या अनुषंगाने उपाययोजनाकौटुंबिक वादातून महिला पोलीस अधिकाऱ्याचा खुनाचा प्रयत्नजणगणना करण्यासाठी गेलेल्या महिला कर्मचाऱ्याचा विनयभंगहसण्यातूनच वाढेल माणसाचा ‘हॅप्पीनेस इंडेक्स’ – मकरंद टिल्लूतपास होणार नसेल तर कार्यालयाला कुलूप लावा -आमदार रोहित पवार

प्रसिध्द रील स्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या

प्रसिध्द रील स्टार रोहिणी पाराध्ये यांची आत्महत्या

ज्या हॉटेलमध्ये बनवले रील्स, तिथेच संपवलं आयुष्य

marathinews24.com

सोलापूर – सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकप्रिय ठरलेली प्रसिद्ध रील स्टार रोहिणी पाराध्ये यांनी टोकाचं पाऊल उचलत मंगळवारी दुपारी आपली जीवनयात्रा संपवली. सोलापुरातील मंगळवेढा तालुक्यातील रत्नागिरी – नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील त्यांच्याच मालकीच्या हॉटेलमध्ये मंगळवारी दुपारी तिने तिच्याच हॉटेलच्या किचनमध्ये लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेत स्वत:ला संपवलं.

सावधान…. सुट्ट्यांमध्ये बंद घरे चोरट्यांच्या रडारवर – सविस्तर बातमी 

इन्स्टाग्रामवर रील्स बनवून आजवर अनेकजण रील स्टार बनले. सोशल मीडियावर अनेकदा मनोरंजनाने परिपूर्ण रील्स पोस्ट करणाऱ्यांच्या खऱ्या आयुष्यात काय समस्या असतील, याचा अंदाज मात्र कोणालाच बांधता येत नाही. सोलापुरातील मंगळवेढ्यातील रोहिणी पाराध्ये या रील स्टारने टोकाचं पाऊल उचलल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी इथं 25 वर्षांच्या रोहिणी पाराध्येनं हॉटेलच्या स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ज्या हॉटेलच्या किचनमध्ये तिने अनेक रील्स बनवले होते, ज्यांना नेटकऱ्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता, त्याच हॉटेलच्या किचनमध्ये तिने तिचं आयुष्य संपवून सर्वांनाच मोठा धक्का दिला.

रोहिणीने निलेश पाराध्येशी लग्न केलं होतं. हे दोघं इन्स्टाग्रामवर रील्स बनवून अल्पावधीतच लोकप्रिय झाले होते. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ नावाने त्यांचा स्वत:चा व्यवसाय होता. गेल्या काही वर्षांपासून दोघंही सोशल मीडियावर सक्रिय होते आणि त्यातून त्यांच्या हॉटेल व्यवसायालाही फायदा मिळत होता. विविध सामाजिक विषयांवर, महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीवर आणि ग्रामीण भागातील जीवनशैलीवर रोहिणी रील्स बनवायची. याच रील्सच्या आधारे तिने इन्स्टाग्रामवर मोठा प्रेक्षकवर्ग निर्माण केला होता. रील्समधून प्रसिद्धी मिळू लागताच हॉटेलचा व्यवसायसुद्धा तेजीत होता. रोहिणी आणि निलेश यांनी त्यांच्या हॉटेलची आणखी एक नवीन शाखा सुरू करण्याचा विचार केला होता. मात्र त्याआधीच रोहिणीने टोकाचं पाऊल उचलत सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. रोहिणीच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×