Breking News
पिस्तुल बाळगणारा अल्पवयीन ताब्यात, भारती विद्यापीठ पोलिसांची कामगिरीशेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ४३ लाखांची फसवणूकमोटारीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यू – मोटारचालक अटकेतपुणे : सराइताकडून भर चौकात महिलेचा विनयभंगदुचाकी लावण्याच्या वादातून तिघांवर हल्लामहाराष्ट्र दिनानिमित्त यशदामध्ये ७१ जणांचे रक्तदानजिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे उद्धाटनजिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून भरघोस निधी – उपमुख्यमंत्री अजित पवारतंत्रज्ञानाच्या युगामध्ये कृषी क्षेत्रात ‘एआय’चा वापर – उपमुख्यमंत्री अजित पवारदुचाकी चोरणाऱ्या त्रिकुटाला अटक, ३ दुचाकी जप्त..

लोणटॅपचे संस्थापक संचालक विकास कुमार यांचे अपघाती निधन

अपघातात उद्योजक विकास कुमार यांचा मृत्यू

marathinews24.com

पुणे – लोणटॅप फायनान्शियल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक संचालक आणि अग्रगण्य फिनटेक उद्योजक विकास कुमार यांचे बुधवारी ( दि. ३०) बंगलोरमधील रस्ते अपघातात निधन झाले आहे. त्यांच्या जाण्यामुळे कंपनीचे दूरदृष्ट प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व गमावले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

बलात्कारी शंतनु कुकडे याच्या बँक खात्यात १०० कोटींवर रक्कम – सविस्तर बातमी 

कुमार हे पुण्यात राहायला होते. लोणटॅपला एक अग्रगण्य डिजिटल कर्ज वितरण व्यासपीठ त्यांनी घडवले होते. त्यांच्या नाविन्यपूर्ण दृष्टिकोनामुळे अनेक ग्राहकांना वेगवेगळ्या आर्थिक गरजांसाठी सुलभ उपाय मिळाले होते. दरम्यान, त्यांच्या निधनाबद्दल कंपनीने शोक व्यक्त केला आहे: आम्ही त्यांच्या मूल्यांवर आधारित कार्यप्रणालीने मार्गक्रमण करत राहू. त्यांनी घातलेल्या मजबूत पायाभूत संरचनेवर आधारित, आमचे ध्येय आणि उद्दिष्टे त्यांच्या प्रामाणिकपणा समर्पणानेच पुढे नेत राहू, असे कंपनीने शोक संदेशात नमूद केले आहे.

फिनटेक क्षेत्रातील सहकारी, उद्योजक आणि मित्रांनी विकास कुमार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांची आठवण कुशल नेतृत्वकर्ता, मार्गदर्शक आणि सहृदयी आहे. विकास कुमार यांनी आपल्या कार्याने जी प्रेरणा दिली आहे, ती भारतीय फिनटेक क्षेत्रात कायम स्मरणात राहील.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top