Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

एकल महिला धोरणासंबंधी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

एकल महिला धोरणासंबंधी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन

महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने कार्यशाळेचे आयोजन

marathinews24.com

पुणे – जिल्हयातील विधवा, घटस्पोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिला यांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्यावतीने २३ जून रोजी सकाळी ११ वाजता शरदचंद्रजी सभागृह, पहिला मजला, जिल्हा परिषद, पुणे येथे एकल महिला धोरण तयार करण्याच्या अनुषंगाने कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहे.

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ६०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र – सविस्तर बातमी 

जिल्हयातील विधवा, घटस्पोटित, परित्यक्ता, अविवाहित व इतर एकल महिला यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाच्यावतीने ‘स्वतंत्र एकल महिला धोरण’ तयार करण्याचे काम सुरु आहे. तसेच २३ जून हा एकल महिला दिवस म्हणून साजरा करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. या कार्यशाळेत रोजगारांच्या संधी, मालमत्तेचा हक्क, अपत्यांचे शिक्षण, निवारा, शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत सुधारणा, अपेक्षित नवीन योजना, कायदेशीर अडचणी, न्यायालयीन प्रक्रियेतील सुधारणा, महिलांची सुरक्षा आणि सहभाग वाढविण्यासंदर्भात सूचना लिखित स्वरुपात सादर करण्यात येणार आहे. एकल महिला धोरणाचा मसुदा तयार करतांना या सूचना व अभिप्रायांचा विचार करण्यात येणार आहे. एकल महिलांच्या समस्यावर शासनाने कोणत्या उपाययोजना कराव्यात, कोणत्या नवीन योजना सुरु कराव्यात, विद्यमान योजनांमध्ये कोणते बदल करावेत आदीबाबत अभिप्राय jimbapune@gmail.com वर पाठविण्यात यावेत.

या कार्यशाळेच्या माध्यमातून एकल महिला, स्वंयसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषय तज्ज्ञांकडून सूचना व अभिप्राय मागविण्यात येणार आहे. त्यामुळे कार्यशाळेस एकल महिला, स्वंयसेवी संस्था, महिला संघटना, सामाजिक कार्यकर्ते, अभ्यासक, संशोधक आणि विषय तज्ज्ञांनी उपस्थित राहावे, असे आवाहन, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे यांनी केलेले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×