Breking News
Savitri Umed Mall Pune : सावित्री-उमेद मॉल’मधून ग्रामीण महिला उद्योजकतेला मिळणार नवी दिशाKhed Solar Agriculture Project : शेतकऱ्यांना पाणी अन् आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा देण्यावर शासनाचा भर- उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवारPanmandwadi Solar Project : सौर प्रकल्पांतून शेतीसाठी दिवसा वीज;शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत– सुनेत्राताई पवारCA Anuj Goyal Pune : जागतिक अर्थव्यवस्थेत भारतीय सनदी लेखापालांचे योगदान मोलाचेPune House Burglary Case : चार राज्यात तपास, दोघांना उत्तर प्रदेशातून बेड्याPune Mangalsutra Theft Case : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले; सराईत जेरबंदDiwali Eye Safety Tips : फटाक्यांच्या ठिणग्यांमुळे कायमस्वरूपी अंधत्वाचा धोका-नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभातेपायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेतMercedes Benz Electric GLC Chakan : महाराष्ट्राला भविष्यातील मोबिलिटीचे जागतिक केंद्र बनविण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसDr Neelam Gorhe Congress Statement : काँग्रेसच्या राजकीय संस्कृतीत महिला सन्मानाला स्थान आहे का-डॉ. नीलम गोऱ्हे

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ६०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ६०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट

marathinews24.com

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे झालेल्या शिबीरात महाराष्ट्रातील तब्बल ६०० ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्ड चे वाटप करण्यात आले. जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत हा उपक्रम सातत्याने सुरु असून महाराष्ट्राच्या विविध शहरांतून तसेच ग्रामीण भागातून हे ज्येष्ठ नागरिक शिबीरासाठी पुण्यात आले होते.

पुण्यातील पाणी कपातीवर पर्याय – सविस्तर बातमी 

पिनॅकल इंडस्ट्रीज, भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि भारतीय कृत्रिम अंग निर्वाण निगम (अ‍ॅलिम्को) यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, उत्सव प्रमुख अक्षय गोडसे, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनील रासने म्हणाले, जय गणेश रुग्णसेवा अभिनायाच्या माध्यमातून २८ हजार हून अधिक गरजू रुग्णांना श्रवणयंत्र देण्यात आले आहेत.सातत्याने विविध शिबीरे आणि सुविधांचा रुग्णांना लाभ होत असून समाजाच्या तळागाळात पोहोचण्याचा ट्रस्टचा प्रयत्न आहे. नुकतेच मोफत महाआरोग्य शिबीरात देखील हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्या पुढील उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली. कानाच्या विकारांप्रमाणेच विविध आजार, कृत्रिम अवयव यांसह सर्व प्रकारची वैद्यकीय मदत ट्रस्टच्या माध्यमातून सातत्याने केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×