जीपीएस यंत्रणेद्वारे दुचाकीचा शोध
marathinews24.com
पुणे – शहरातील मध्यवर्ती प्रभात रस्ता परिसरातून संगीत शिक्षकाची दुचाकी चोरुन नेल्याची घटना नुकतीच घडली. दुचाकीला ‘जीपीएस’ यंत्रणा असल्याने शिक्षकाने स्वत: दुचाकी शोधून काढली. बिबवेवाडी परिसरात दुचाकी सापडली. चोरट्याने दुचाकीचे काही भाग चोरुन नेले. याबाबत एका संगीत शिक्षकाने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोंदू बाबाची ‘आरती’ अन ‘पायधुणी’ – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे प्रभात रस्ता परिसरात राहायला आहेत. रविवारी (२१ जून) पहाटे बंगल्याच्या आवारात लावलेली दुचाकी चोरट्याने चोरुन नेली. दुचाकी चोरीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. दुचाकीला जीपीएस यंत्रणा असल्याने त्यांनी दुचाकीचा शोध घेेण्यास सुरुवात केली. तेव्हा दुचाकी बिबवेवाडी परिसरात लावल्याची माहिती मिळाली. दुचाकीचा शोध त्यांनी घेतला. चोरटा बिबवेवाडीत दुचाकी सोडून पसार झाल्याचे उघडकीस आले. चोरट्याने दुचाकी लावलेल्या पिशवीतून तांब्याचे भांडे चोरुन नेल्याचे उघडकीस आले. पोलीस कर्मचारी घाडगे तपास करत आहेत.























