Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त-वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे

बारामती वनविभागाची धडक कारवाई

बारामती वनविभागाची धडक कारवाई

marathinews24.com

बारामती – रुई गावच्या हद्दीत बारामती-भिगवण रोडकडून बारामती एमआयडीसी परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यावर धडक कारवाई करुन विनापरवाना लाकूड वाहतूक करणारा टेम्पो जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वअश्विनी शिंदे यांनी दिली आहे.

पुण्यात पिस्तूलांचा बाजार मांडणार्‍या सराईताला बेड्या – सविस्तर बातमी 

पारवडीचे वनरक्षक संतोष जराड व हंगामी रोजंदारी मजूर यांच्या पथकाला टाटा कंपनीचा पांढऱ्या क्रीम रंगाचा एक टेम्पो संशयास्पदरित्या आढळून आला. चौकशी केली असता टेम्पोमध्ये कडूनिंब व जांभूळ वृक्ष प्रजातीचे विनापरवाना तोडलेले अंदाजे ८ ते ९ टन मुद्देमाल विना वाहतूक परवाना वाहतूक करत असल्याचे आढळून आले. मुद्देमालसह टेम्पो पुढील चौकशीकरिता वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या आवारात जमा करण्यात आले. वाहन चालक फरार झाला असून वाहन चालक व मालक यांच्याविरुद्ध भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४१,४२ व ५२ (१) अन्वये वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, वनपाल एस.आर.उंडे, संतोष जराड वनरक्षक करीत आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×