Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार

सिंचन सुधारणा कार्यक्रमातांर्गत प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उभाणार

मंत्री विखे पाटील यांची माहीती

marathinews24.com

मुंबई – महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमातर्गत विविध प्रकल्पांसाठी नाबार्डच्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यात येईल. कार्यक्रमाच्या टप्पा दोन अंतर्गत होणाऱ्या या कामातून कृष्णा खोरे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत विविध सिंचन प्रकल्पातील कामांसाठी गती मिळेल असा विश्वास जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.

जय गणेश रुग्णसेवा अभियानांतर्गत ६०० ज्येष्ठांना मोफत श्रवणयंत्र – सविस्तर बातमी 

मंत्रालयात जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी आमदार सत्यजित पाटील , आमदार अमोल जगताप, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, सचिव संजय बेलसरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक डॉ हनुमंत धुमाळ, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळचे कार्यकारी संचालक जयंत गवळी उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील म्हणाले, महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रम राज्यातील पूर्ण झालेल्या १५५ जलसिंचन प्रकल्पांच्या कालवे व वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्याच्या कामासाठी ५ हजार ३६ कोटी रुपये तरतुदीसाठी प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. नाबार्ड च्या माध्यमातून निधी उपलब्धतेच्याया दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून कामास गती दिली जाईल.

अपूर्ण सिंचन प्रकल्प तसेच पूर्ण प्रकल्पांच्या वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करणेसाठी या टप्प्यातील ७५०० कोटीपैकी गोदावरी व कृष्णा खो-यात निधी उपलब्ध होणार असून सदयस्थिती झालेला खर्चबाबतचा आढावा घेण्यात आला. मंत्रिमंडळ बैठकीत यापूर्वीच महाराष्ट्र सिंचन सुधारणा कार्यक्रमांतर्गत निर्मित सिंचन क्षमता व प्रत्यक्ष सिंचन क्षमता यामधील तफावत दूर करण्याच्या दृष्टीने प्रथम टप्यात महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे अंतर्गत २१ प्रकल्पांना व गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर अंतर्गत १० प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.

यामध्ये महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ, पुणे आणि गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर एकूण ३१ प्रकल्पांच्या बाबत चर्चा करण्यात आली. गोदावरी उजवा तट कालवा प्रकल्पाचा टप्पा २ मधून टप्पा १ मध्ये समावेश करण्यात आला आहे. तसेच प्रवरा डावा व उजवा कालवा दुरुस्ती व भोजापूर मध्यम प्रकल्प या प्रकल्पांचा प्रथम टप्यात नव्याने समावेश करण्यात आला आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×