पीडित महिलेकडून १३३ पानी जबाब
marathinews24.com
पुणे – दैवी अवतार असल्याची बतावणी करुन उच्चशिक्षित महिलेवर अत्याचार करणाऱ्या भोंदू राधामोहन मिश्रा याच्यासह साथीदारांची सोमवारी येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. या प्रकरणातील पीडित महिलेने तिच्या गुदरलेल्या प्रसंगाची माहिती १३३ पानांमधून पोलिसांना दिली आहे. राधामोहन मिश्रा (वय ५९) याच्यासह स्वामी कंवल नयन (वय ५८) आणि सहा महिलांना खराडी पोलिसांनी अटक केली आहे. लैंगिक अत्याचार, कट रचणे, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा अधिनियमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
तुळापूरातील पार्टीत पुण्यातील पबमधील मद्यसाठा – सविस्तर बातमी
पोलिसांनी मिश्राच्या आश्रमावर छापा टाकून तेथून १२ लॅपटाॅप, एक टॅब, ११ मोबाइल संच, १९ हार्ड डिस्क, साडेसहा लाखांची राेकड, डीव्हीडी, २३ पेन ड्राइव्ह, दहा काडतुसे, १५ लाखांचे दागिने जप्त केले. पीडित महिलेने खराडी पोलिसांकडे पुरवणी जबाब दिला आहे. ‘मिश्राने अत्याचार केले. महिला भक्तांसमोर तो अत्याचार करत होता. या प्रकरणातील आरोपी महिलांनी मिश्राला साथ दिली. आरोपी महिलांनी पीडित महिलेला मेणबत्तीचे चटके दिले. भोंदूने महिलेची संपत्ती स्वत:च्या नावावर करून घेतली’ असे पीडित महिलेने जबाबात म्हटले आहे. घटनेनंतर समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित झाली.
भोंदू मिश्रा याची भक्तांकडून आरती केली जात असल्चो चित्रफितीत दिसून आले आहे. मिश्रा याचे पाय पाणी आणि दुधाने धुतले जात असून, ‘चरणामृत’ म्हणून ते भाविकांना दिल्याचे चित्रफितीतून दिसून आले आहे. मिश्राने पीडित महिलेवर १७ वर्ष अत्यचाार केले. महिलेच्या आई-वडिलांची त्याच्यावर श्रद्धा होती. दैवी अवतार असल्याचा दावा करुन त्याने महिलेवर अत्याचार केले होते. त्याच्या दुष्कृत्यात आश्रमातील महिलांनी साथ दिली होती. याप्रकरणात ६ महिलांना अटक केली होती. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण या प्रकरणाचा तपास करत आहेत.
सांकेतिक शब्दामुळे अडथळे
पोलिसांनी मिश्राच्या आश्रमातून पेन ड्राईव्ह, हार्ड डिस्क , लॅपटाॅप अशा इलेक्ट्राॅनिक वस्तू जप्त केल्या आहेत. लॅपटाॅप उघडताना सांकेतिक शब्दाचा (पासवर्ड) करावा लागतो. सांकेतिक शब्द मिळाल्यानंतर लॅपटाॅप उघडता येईल. त्यामाध्यमातून तपासाच्या दृष्टीने महत्वाची माहिती मिळेल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
अटक करण्यात आलेल्या महिलेला दिलासा
या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सहा महिलांनी पुणे पोलिसंनी चुकीच्या पद्धतने अटक केल्याचा आरोप करुन मुंबई उच्च न्यायालयात ‘हॅबिअस काॅर्पस’ (बेकायदा अटक) याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयात सोमवारी या याचिकेवर सुनावणी झाली. अमृता मिश्रा या महिलेची अटक बेकायदा असल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट करुन तिला दिलासा दिला. मात्र, अन्य महिलांची अटक ही कायदेशीर असून, हे प्रकरण गंभीर असल्याचे न्यायालायने स्पष्ट केले.























