Breking News
Pune Crime News : अटकेची भीती दाखवून ज्येष्ठाची १९ लाखांची फसवणूकखरेदीच्या बहाण्याने सराफी पेढीतून दागिने चोरीPune Cash Seizure : गणेशोत्सवात एकाकडे ४२ लाखांची रोकड सापडलीPune PG Hostel Action : पुण्यात अनधिकृत पीजी, हॉस्टेल व्यावसायिकांचे धाबे दणाणलेआयुष्मान भारत कार्ड योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा – डॉ. कोमल पडवळAapla Dawakhana : आपला दवाखान्यातील उपलब्ध आरोग्य सुविधांचा नागरिकांनी लाभ घ्यावा –डॉ. कोमल पडवळमहिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी नोंदणीबाबत महिलांना मार्गदर्शनSeva Sankalp Abhiyan : सेवा संकल्प अभियानातून पुणे जिल्ह्यात राबवणार विविध लोकाभिमुख उपक्रमएस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटनLokSamvad 2026 : लोकसंवाद-२०२६’ अंतर्गत सुरक्षित रस्ता वाहतूक यावर विशेष कार्यक्रम

आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोल तपास – पोलीस अधीक्षक

आरोपींविरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी सखोत तपास-पोलीस अधीक्षक

केतन अगरवाल खून प्रकरण

marathinews24.com

पुणे – ‘केतन अगरवाल खून प्रकरणातील नियोजित पत्नी सिया चौधरी, तिचा प्रियकर चेतन चैाधरी यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे. पोलीस कोठडीत आरोपींची चैाकशी करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी सियाने केतन याला लोहगडावरुन १४ जूनला ढकलून देण्याचा प्रयत्न केल्याची माहिती तपासात मिळाली आहे. आरोपींविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे,’ असे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पुण्यात सॉफ्टवेअर कंपनीला २ कोटींचा चुना, कामगारांविरूद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

केतन अगरवाल याची लोहगडावर हत्या करण्यासाठी त्याची नियोजित पत्नी सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांनी कट रचला आणि थंड डोक्याने दोघांनी मिळून त्याचा खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. केतन याला सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चैाधरी यांनी १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून दिले. केतनच्या मृत्यू प्रकरणी अगरवाल कुटुंबीयांनी संशय व्यक्त केल्यानंतर पाेलिसांनी या प्रकरणाचा तपास करून खून प्रकरणाचा छडा लावला. केतनचा खून करण्यासाठी दोघांनी कट रचला. पोलिसांना संशय येऊ नये म्हणून दोघांनी काळजी घेतली होती.

या घटनेनंतर पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी गुरुवारी पुन्हा पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘केतन अगरवाल खून प्रकरण संवेदनशील आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत आहे. सियाने १४ जून रोजी केतनला लोहगडावरुन दरीत ढकलून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, हा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. तपासात याबाबतची माहिती मिळाली आहे. दोघांना वडगाव मावळ न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आरोपीविरुद्ध जास्तीत जास्त भक्कम पुरावे गोळा करण्याच्या दृष्टीने तपास करण्यात येत आहेत.

अगरवाल खून प्रकरणात अनेकांची चौकशी सुरू आहे. तपासाच्या दृष्टीने माहिती मिळवण्यासाठी चौकशी करण्यात येत आहे. चौकशीला बोलविल्यानंतर ताब्यात घेतले, असा अर्थ काढता कामा नये. हे प्रकरण संवेदनशील आहे. प्रसारमाध्यमांनी वार्तांकन करताना भान राखणे गरजेचे आहे. तर्क वितर्कावर आधारित वृत्त प्रसारित करणे चुकीचे आहे.

– संदीपसिंग गिल, पोलीस अधीक्षक

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×