Breking News
पुणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील कार्यालयात आगपुण्यात सिमेंट मिक्सर’वाहतुकीला दोन दिवस सवलतशोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे प्रातिनिधिक दर्शन घडतेआषाढी वारी २०२६ दरम्यान एलपीजी सुरक्षा जनजागृती अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद‘तारपा’साठीच आमची वंशावळ-भिकल्या लाडक्या धिंडा यांची भावनापुणे जिल्ह्यातील दोन सराईत टोळ्यांविरुद्ध मोक्कापोलीस असल्याचे सांगून महाविद्यालयीन तरूणाला मारहाणजनगणनेनंतरच अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाडिजीटल अटक करण्याची भीती, जेष्ठाला ११ लाखांचा गंडा

खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली

खासगी कंपनीची बस पाण्यात अडकली

बसमधील कर्मचाऱ्यांची सुटका

marathinews24.com

पुणे – खासगी कंपनीची बस साचलेल्या पाण्यात अडकल्याची घटना वाघोली-लोहगाव रस्त्यावर मंगळवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात अडकलेल्या बसमधील सहा कर्मचाऱ्यांची सुटका केली. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. शहर परिसरात संततधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी सकाळी झालेल्या मुसळधार पावसामुळे लोहगाव वाघोली रस्त्यावर मोठ्या प्रमाणवर साचले होते. पावसामुळे पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यावेळी लोहगाव-वाघोली रस्त्यावरुन निघालेल्या बस चालकाने पाण्यात बस नेली. पाण्यात बस अडकली.

पुण्यातील नाना पेठेत वाड्याची भिंत कोसळली, ३ दुचाकींचे नुकसान – सविस्तर बातमी 

पाण्यातून मार्ग काढता न आल्याने बस चालक गोंधळला. बसमधील कर्मचारी घाबरले. रस्त्यावर साधारणपणे चार ते पाच फूट पाणी साचल्याने बस चालकासह कर्मचाऱ्यांना बसमधून बाहेर पडता येणे शक्य नव्हते. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला कळविण्यात आली.

पुणे महापालिका, तसेच पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अग्निशमन दलातील जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी प्रसंगावधान राखून पाण्यात अडकलेल्या बस चालकासह कर्मचाऱ्यांना दोराचा वापर करून बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळली. जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावरील भुयारी मार्गात साचलेल्या पाण्यात टेम्पो अडकल्याची सोमवारी दुपारी घडली. पाण्याच्या प्रवाहात टेम्पो वाहून जाताना बंदोबस्तास असलेल्या वाहतूक पोलिसांनी पाहिला. पोलिसांनी यावेळी दाखविलेल्या तत्परतेमुळे टेम्पो चालकाचे प्राण वाचले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×