खराडी-हडपसर बाह्यवळण मार्गावर घडली घटना
marathinews24.com
पुणे – दुभाजकावर आदळून दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना खराडी बाह्यवळण मार्गावर घडली. आकाश प्रकाश पुरभे (वय २७, रा. सिद्धनाथ निवास, कदमवाक वस्ती, लोणी काळभोर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. पोलीस हवालदार रवींद्र टेंगले यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बिबवेवाडीतील भोंदू मोनाली विधातेविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार आकाश १७ जुलै रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास खराडी-हडपसर बाह्यवळण मार्गावरुन निघाला होता. भरधाव दुचाकी मगरपट्टा परिसरात दुभाजकावर आदळली. दुचाकीस्वार आकाश याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. उपचारांदरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला. भरधाव वेगामुळे दुचाकी दुभाजकावर आदळून अपघात झाल्याची माहिती चौकशीत मिळाली. पोलीस हवालदार टेंगले तपास करत आहेत.




















