विश्रांतवाडीत अल्पवयीनांसह टोळक्याचा राडा
marathinews24.com
पुणे – Vishrantwadi Crime : पान टपरीसमोर उभी केलेली दुचाकी बाजूला लावण्यास सांगितल्याचा राग आल्यामुळे अल्पवयीनांसह टोळक्याने व्यावसायिकासह त्याच्या वडिलांना शिवीगाळ केली. हातातील धारदार शस्त्रे हवेत फिरवून परिसरातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. तसेच एकाच्या घरावर शस्त्र मारुन नुकसान केल्याची घटना ५ ऑक्टोबरला रात्री दहाच्या सुमारास विश्रांतवाडीतील भीमनगरात घडली आहे. याप्रकरणी तिघा अल्पवयीनांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, चौघांचा शोध घेतला जात आहे.
मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे विश्रांतवाडीत राहायला असून, त्यांची पानटपरी आहे. ५ ऑक्टोबरला अल्पवयीनांनी त्यांची दुचाकी पानटपरीसमोर उभी केली होती. त्यामुळे संबंधित तरुणाने त्यांना दुचाकी बाजूला लावण्यास सांगितले. त्याचा राग आल्यामुळे टोळक्याने तक्रारदारासह त्यांच्या वडिलांना शिवीगाळ केली. Vishrantwadi Crime हातातील शस्त्रे हवेत फिरवून नागरिकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यासोबतच तक्रारदाराच्या घराशेजारी राहणार्या एकाच्या घरावर शस्त्र मारुन नुकसान केले आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक कदम तपास करीत आहेत.
























