Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Chatushrungi Devi : पुण्यातील श्री चतुःशृंगी देवीचा नवरात्रोत्सव ११ ऑक्टोबरपासून

धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल

marathinews24.com

पुणे – शहरातील श्री चतुःशृंगी देवी मंदिरात यंदाचा नवरात्रोत्सव ११ ते २० ऑक्टोबरदरम्यान साजरा होणार आहे. घटस्थापना, महापूजा, महाआरती, स्तोत्रपठण आणि नवचंडी होम आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दसऱ्याला देवीची पालखी मिरवणूक निघणार असून, पालखीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे, अशी माहिती श्री देवी चतुःशृंगी मंदिर ट्रस्टच्या वतीने कार्यकारी विश्वस्त श्री देवेंद्र अनगळ यांचेतर्फे देण्यात आली.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान – सविस्तर बातमी

रविवारी (ता. ११) सकाळी नऊ वाजता घटस्थापना श्री श्रीधर अनगळ यांचे हस्ते होईल. देवीला मंगलस्नान, पंचामृत आणि सुगंधी द्रव्यांचा अभिषेक करून सालंकृत पोशाखात महापूजा करण्यात येईल. त्यानंतर महानैवेद्य अर्पण केला जाईल. पौरोहित्य श्रीराम नारायण कानडे गुरुजी करणार आहेत. अशी माहिती अध्यक्ष श्री दिलीप अनगळ यांनी दिली. उत्सव काळात मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी अहोरात्र खुले राहणार आहे. दररोज सकाळी दहा आणि रात्री आठ वाजता महाआरती होणार आहे. यावेळी नगारा, चौघडा आदी पारंपरिक वाद्यांसह शंखनाद केला जाईल. गणपती मंदिरात महिला मंडळांतर्फे सकाळी दहा ते सायंकाळी सहा या वेळेत श्रीसूक्त, ललितासहस्रनाम, महिषासुरमर्दिनी स्तोत्र आणि देवीच्या स्तोत्रांचे पठण होईल. सुयोग मित्र मंडळाच्या वतीने मंदिर परिसरात शनिवारी (ता. १७) दुपारी ४.०० ‘आजीबाईंचा भोंडला’ही आयोजित करण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. २०) सकाळी नऊ वाजता नवचंडी होम सुरू होईल. सायंकाळी पाच वाजता सीमोल्लंघनासाठी देवीच्या पालखीचे प्रस्थान होणार आहे. बँड, ढोल, लेझीम, नगारा, चौघडा आणि सनईच्या साथीने मिरवणूक निघेल. ढोल-ताशा पथके आणि शंखनाद पथक मिरवणुकीत सहभागी होणार आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून तीन टप्प्यांपैकी पहिल्या टप्पा पूर्ण झाला आहे. त्यामध्ये ध्यान मंदिरापासून सभा मंडपाच्या बांधकामाचा समावेश आहे. उर्वरित दोन टप्पे पुढील एका वर्षामध्ये पूर्ण होतील. देवस्थान ट्रस्ट तर्फे देवीच्या देवळा वर सोन्याचा कळस बसविण्यात येणार असुन हे काम पुढील वर्षाच्या आत करण्याचे उद्दिष्ट आहे.

ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग भाविक आणि गर्भवती महिलांसाठी दोन मोठ्या लिफ्टची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. लिफ्टमधून उतरल्यावर भाविकांना मुख्य मंदिराच्या सभामंडपात जाता येईल. लिफ्ट चे काम पुढील नवरात्रापूर्वी पूर्ण करण्याचा मानस आहे. दर्शनरांगांसाठी बॅरिकेडिंग करण्यात आले आहे. ऑनलाइन दर्शन पासची सुविधा उपलब्ध असून, मंदिर परिसरात पास वितरणासाठी तीन काउंटर उभारण्यात आले आहेत. पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या सहकार्याने महाविद्यालयाच्या मैदानावर विनामूल्य वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे.

भाविकांच्या सुरक्षेसाठी सुरक्षारक्षक, स्वयंसेवक, पोलिस आणि निमलष्करी दलाची नियुक्ती करण्यात आली आहे. संपूर्ण मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी अनिरुद्ध बापू केंद्राचे १५० स्वयंसेवक सेवा देणार असून, अग्निशमन दलाचे वाहनही तैनात राहणार आहे.

वैद्यकीय सेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका, डॉक्टर आणि वैद्यकीय पथक उपलब्ध राहणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत औषधोपचार मोफत दिले जातील. भाविकांसाठी विमा संरक्षणाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. परिसरात स्वच्छता, जंतुनाशक फवारणी, विद्युत रोषणाई आणि चोवीस तास जनरेटरची व्यवस्था करण्यात आली आहे.

नवरात्रोत्सवातील ठळक कार्यक्रम

११ ऑक्टोबर, सकाळी ९ : घटस्थापना आणि देवीची महापूजा.

दररोज सकाळी १० व रात्री ८ : पारंपरिक वाद्यांच्या साथीने महाआरती.

१७ ऑक्टोबर, दुपारी ४ : सुयोग मित्र मंडळाचा ‘आजीबाईचा भोंडला’

२० ऑक्टोबर, सकाळी ९ : नवचंडी होम.

२० ऑक्टोबर, सायंकाळी ५ : सीमोल्लंघनासाठी पालखी मिरवणूक.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×