Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Baramati Medical Collage : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरात स्वच्छता अभियान

सेवा संकल्प अभियानातून बारामतीत स्वच्छता अभियान

marathinews24.com

बारामती – सेवा संकल्प अभियानांतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोेपचार रुग्णालय, बारामती परिसर स्वच्छ, सुंदर व आरोग्यदायी ठेवण्याच्या उद्देशाने अधिष्ठाता डॉ. अंजली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

पुणे बंद करण्याची भूमिका घेत असाल तर पुणेकरच उत्तर देतील’; MPSC आंदोलनावर आमदार डावखरेंचा रोहित पवारांना सल्ला – सविस्तर बातमी

महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील स्वच्छता राखणे, परिसराचे सौंदर्यीकरण करणे तसेच स्वच्छतेबाबत जनजागृती वाढविणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश होता. अभियानात महाविद्यालयातील प्राध्यापक, वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थी, तांत्रिक व अतांत्रिक कर्मचारी, परिचारिका तसेच संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

अभियानादरम्यान महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. कचऱ्याचे योग्य संकलन व विलगीकरण, परिसर स्वच्छ ठेवणे आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेचे महत्त्व याबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच “स्वच्छ परिसर, निरोगी समाज” हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

या उपक्रमाच्या नियोजनासाठी डॉ. मीनल शिंगाडे, सहयोगी प्राध्यापक, शरीरविकृतीशास्त्र विभाग यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण हाके यांनी समन्वयासाठी सहकार्य केले.

वैद्यकीय व नर्सिंग विद्यार्थ्यांच्या सक्रिय सहभागामुळे स्वच्छतेचा संदेश विद्यार्थी, रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे. स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून महाविद्यालय व रुग्णालय परिसर सातत्याने स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प करण्यात आला असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×