Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Pune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्या

Pune Police Suicide

औंधमधील घटना

marathinews24.com

पुणे – Pune Police Suicide : पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाने ओैंधमधील राहत्या घरात पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी दुपारी घडली. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. नीलेश भाऊसाहेब पाटील (वय ५५, रा. नागरस रस्ता, औंध) असे आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. पाटील हे विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक होते.

पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटक – सविस्तर बातमी 

पुणे पोलीस दलात भरती झाल्यानंतर ते पदोन्नतीने (श्रेणी) पोलीस उपनिरीक्षक झाले. उच्च न्यायालयातील कामासाठी ते बुधवारी (७ ऑक्टोबर) मुंबईला जाणार होते. मात्र, ते मुंबईला गेले नाही. ओैंधमधील नागरस रस्त्यावरील एका सोसायटीत ते राहत होते. (Pune Police Suicide) बुधवारी दुपारी साडे तीनच्या सुमारास ते घरी होते. त्यावेळी त्यांचा मुलगा घरात होता. घरातील सोफ्यावर बसलेल्या पाटील यांनी शासकीय पिस्तुलातून गोळी झाडून घेतली. गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर त्यांचा मुलगा खोलीतून बाहेर आला. तेव्हा पाटील हे सोफ्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.

‘पोलीस उपनिरीक्षक नीलेश पाटील यांना आरोग्यविषयक समस्या होत्या. गणेशोत्सवापूर्वी ते एक ते दोन महिने सुट्टीवर होते. गणेेशोत्सवातील बंदोबस्तासाठी ते कामावर रूजू झाले होते. आरोग्यविषयक समस्या जाणवू लागल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून ते नैराश्यात होते. त्यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे, असे चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी सांगितले. दरम्यान, पाटील यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. ते पूर्वी खडक पोलीस वसाहतीत राहत होते. पाटील यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर पुणे पोलीस दलात शाेककळा पसरली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×