Breking News
Mukhyamantri Gramin Pashudhan Yojana : मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेसाठी लवकरच ऑनलाइन अर्जCarl Ross Filmmaking : साचेबद्धपणा टाळून चित्रपट निर्मिती करा-कार्ल रॉसSenior Citizen Health Camp : सामाजिक न्याय भवन येथे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरBlood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळPune Police Suicide : पुण्यात पोलीस उपनिरीक्षकाची गोळी झाडून आत्महत्याPune Crime Branch : पुण्यात एक वर्षापासून फरार आरोपीला अटकVishrantwadi Crime : दुचाकी पार्किंगचा वाद कोयते उगारण्यावरMobile Banking Fraud : मोबाइल बँकिंगचा घेतला ताबा, १० लाखांचा गंडाPune Graduate Teacher Election : पुणे विभाग पदवीधर, शिक्षक द्विवार्षिक निवडणूक- २०२६; जिल्हास्तरीय माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समिती कार्यान्वितBajaj Pune Grand Tour : बजाज पुणे ग्रँड टूरला UCI 2.1 श्रेणी; २६ ते ३१ जानेवारीदरम्यान सहा टप्प्यांची स्पर्धा

Blood Donation Campaign : सेवा संकल्प अभियानातून ‘रक्तदानाचा संकल्प’; पुणे जिल्ह्यात जीवनदानाची चळवळ

Blood Donation Campaign

स्थानिक गरजेनुसार सेवा योगदानाचा उपक्रम; जिल्हा परिषद आरोग्य विभागाचा पुढाकार

marathinews24.com

पुणे – Blood Donation Campaign : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत स्थानिक गरजेनुसार विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाने रक्तदान शिबिराच्या माध्यमातून ‘सेवा संकल्पातून जीवनदान’ देण्याचा संकल्प केला आहे.

अवैध गर्भलिंग निदानाविरोधात यंत्रणा अधिक सक्रिय करणार : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर – सविस्तर बातमी 

अपघातग्रस्त, शस्त्रक्रियेसाठी दाखल रुग्ण, प्रसूतीतील माता, कर्करोग तसेच विविध गंभीर आजारांवरील उपचार घेत असलेल्या रुग्णांना अनेकदा तातडीने रक्ताची आवश्यकता भासते. त्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध असणे आवश्यक आहे. ही स्थानिक गरज लक्षात घेऊन सेवा योगदानासाठी रक्तदान शिबिराची निवड करण्यात आली आहे.

“रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून एखाद्याला नवजीवन देण्याची माणुसकीची सेवा आहे. ‘सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून रक्तदानाचा संकल्प अधिक व्यापक करून प्रत्येक पात्र नागरिकाने या जीवनदायी उपक्रमात सहभागी व्हावे. आपल्या रक्ताचा प्रत्येक थेंब एखाद्या कुटुंबासाठी आशेचा किरण ठरू शकतो,” असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केले.

अधिकारी-कर्मचाऱ्यांसह नागरिकांचा सहभाग

रक्तदान शिबिरात जिल्हा परिषद आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांनी सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याची आवश्यक वैद्यकीय तपासणी करून वैद्यकीय निकषांनुसार रक्तसंकलन करण्यात येणार आहे.

रक्तदानाबाबत समाजात असलेले गैरसमज दूर करून पात्र व्यक्तींनी नियमित रक्तदान करणे गरजेचे आहे. एका रक्तदात्याच्या रक्ताचा उपयोग गरजू रुग्णांच्या उपचारासाठी होऊ शकतो. त्यामुळे रक्तदान हा केवळ सामाजिक उपक्रम नसून संकटाच्या काळात एखाद्या कुटुंबाला आधार देणारी मानवतेची सेवा आहे.

“स्थानिक गरज ओळखून समाजाला प्रत्यक्ष उपयोगी पडणारे सेवा योगदान देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. Blood Donation Campaign रक्ताची गरज कोणत्याही वेळी कोणालाही भासू शकते. त्यामुळे रक्तदान शिबिराच्या माध्यमातून गरजू रुग्णांसाठी रक्त उपलब्ध करून देणे ही खऱ्या अर्थाने जीवनदानाची सेवा आहे. पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान करून या सेवा संकल्पात योगदान द्यावे,” असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितले.

सेवा योगदानातून सामाजिक बांधिलकी

‘सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवरील गरजा ओळखून नागरिकांच्या सहभागातून विविध सेवा उपक्रम राबविण्यात येत आहेत. आरोग्य विभागाने रक्तदान शिबिराची निवड करून ‘सेवा संकल्पातून जीवनदान’ हा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आजचे रक्तदान उद्याच्या एखाद्या जीवासाठी आशेचा किरण ठरू शकते,’ या भावनेतून पात्र नागरिकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन सेवा संकल्प अभियानाला बळ द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषद पुणे आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×