Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Cyber Fraud : सायबर चोरट्याची चलाखी अन कंपनीने गमावले ७ लाख रुपये

Pune Municipal Corporation Job Fraud

पुण्यात सायबर चोरट्यांनी बनावट ई-मेल आयडी व बँक तपशील पाठवून कंपनीला ७.१० लाखांचा घातला गंडा

 marathinews24.com

पुणे – Pune Cyber Fraud : कंपनीचे साहित्य खरेदी करण्यासाठी झालेल्या व्यवहारातील १० टक्के रक्कम आगाउ देण्याचा सायबर चोरट्यांनी गैरफायदा घेतला आहे. संबंधित कंपनीऐवजी दुसराच मेल आयडी, बँक तपशील पाठवून कंपनीची तब्बल ७ लाख १० हजारांची फसवणूक केली आहे. ही घटना २३ जानेवारी ते १४ ऑक्टोबर २०२६ कालावधीत कोथरुडमधील करिश्मा सोसायटीजवळ घडली आहे. याप्रकरणी विशाल मुळे वय २९ रा. कोथरूड यांनी अलंकार पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पुण्यातील लक्ष्मी रस्ता, विमाननगरला लुटीची घटना – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळे हे कोथरुडमधील खासगी कंपनीत कामाला असून, त्यांच्या कंपनीला काही साहित्य खरेदी करायचे होते. त्यासाठी कंपनीने सनमीश एनर्जी प्रा. लि कंपनीसोबत संपर्क केला. त्या कंपनीने साहित्याचे ७० लाख ९७ हजारांचे कोटेशन दिले. त्यापैकी १० टक्के रक्कम अ‍ॅडव्हान्स आणि उर्वरित रक्कम टप्प्याने देण्यात येणार होती. परंतु त्याचवेळी संबंधित कंपनीच्या नावाऐवजी सायबर चोरट्याने स्वतःचा नावाचा मेल आयडी पाठवून दिला. Pune Cyber Fraud तक्रारदार मुळे यांच्या कपंनीने ७ लाख १० हजारांची आगाउ रक्कम संबंधित बँकखात्यात पाठवून दिली. मात्र, फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक स्मिता पाटील तपास करीत आहेत.

कपाटातील साडे पाच लाखांचे दागिने चोरीला

घरातील कपाटातून ५ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना ७ ते ८ ऑक्टोबरला कोंढव्यातील कौसरबाग रोडवरील हिलमिस्ट हारमनी इमारतीत घडली आहे. याप्रकरणी ४७ वर्षीय नागरिकाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे कुटूंबियासह कोंढव्यातील कौसरबाग परिसरातील हिलमिस्ट हारमनी सोसायटीत राहायला आहेत. ७ ते ८ ऑक्टोबर कालावधीत चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश केला. कपाटातील पर्समध्ये असलेले ५ लाख ६० हजारांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी चोरीच्या घटनेची माहिती मिळताच संबंधिताने नुकतीच कोंढवा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक संजय लोखंडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×