Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Mahalakshmi Temple Pune : श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण

Mahalakshmi Temple Pune

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग

marathinews24.com

पुणे – Mahalakshmi Temple Pune : सारसबाग येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सव २०२६ निमित्त भक्तिमय वातावरणात श्री महासरस्वती देवीच्या चरणी पवित्र स्फटिक माळ, तर श्री महाकाली देवीच्या चरणी रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली. श्री महालक्ष्मी मंदिरात श्री महाकाली, श्री महालक्ष्मी आणि श्री महासरस्वती या आदिशक्तीच्या तीन रूपांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. या तिन्ही देवींचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व अनन्यसाधारण आहे.

विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी अचूक, पारदर्शक व नियमानुसार पार पाडा -विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले – सविस्तर बातमी 

ज्ञान, विद्या, बुद्धी आणि निर्मळतेचे प्रतीक असलेल्या श्री महासरस्वती देवीला स्फटिक माळ अर्पण करण्यात आली. स्फटिक हे पवित्रता, शांतता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. तर शक्ती, साहस आणि दुष्ट प्रवृत्तींच्या संहाराचे प्रतीक असलेल्या श्री महाकाली देवीला रुद्राक्ष माळ अर्पण करण्यात आली. (Mahalakshmi Temple Pune) रुद्राक्षाला हिंदू धर्मपरंपरेत विशेष आध्यात्मिक महत्त्व असून त्याचा भगवान शिवाशी घनिष्ठ संबंध मानला जातो. नवरात्रोत्सवाच्या पवित्र पर्वात देवींच्या चरणी करण्यात आलेले हे माळार्पण श्रद्धा, भक्ती आणि भारतीय आध्यात्मिक परंपरेचे दर्शन घडविणारे ठरले.

श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे सुरू असलेल्या सार्वजनिक नवरात्रोत्सवात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून देवींचे दर्शन घ्यावे, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×