Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Pune Cyber Fraud News : सायबर चोरट्यांकडून ज्येष्ठ महिलेची १४ लाखांची फसवणूक

Pune Cyber Fraud News

कोंढवा पोलीस ठाण्यात सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल

marathinews24.com

पुणे – Pune Cyber Fraud News : सिनिअर सिटीजन कार्ड देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची सायबर चोरट्यांनी १४ लाख २७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ज्येष्ठ महिलेने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बेकायदा प्रवासी वाहतूक प्रकरणी ‘रॅपिडो’विरुद्ध गुन्हा – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ महिला कोंढव्यातील फकरी हिल्स भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर १३ ऑक्टोबर रोजी संपर्क साधला. एका राष्ट्रीयकृत बँकेतील अधिकारी बोलत असल्याची बतावणी चोरट्यांनी केली. बँकेकडून सिनिअर सिटीजन कार्ड देण्यात येणार आहे, अशी बतावणी चोरट्यांनी केली. चोरट्यांनी त्यांच्या मोबाइल क्रमांकावर एपीके फाईल पाठविली. Pune Cyber Fraud News एपीके फाईल उघडल्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या मोबाइल क्रमांकाचा तांत्रिक ताबा (हॅक) घेतला. मोबाइल क्रमांकाची जोडणी बँक खात्याशी करण्यात आली आहे. चोरट्याने बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. ज्येष्ठ महिलेच्या बँक खात्यातून १४ लाख २७ हजार रुपयांची रक्कम काढून घेण्यात आली. ही रक्कम दुसऱ्या खात्यात वळविण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक तांबोळी तपास करत आहेत.

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ३९ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची चोरट्यांनी ३९ लाख ७४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी सायबर चोरट्यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत एका ज्येष्ठ नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ७२ वर्षीय ज्येष्ठ नागरिक हे हडपसरमधील काळेबोराटेनगर परिसरात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबइल क्रमांकावर संपर्क साधला. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले. चोरट्यांनी त्यांना एक ॲप मोबाइलमध्ये घेण्यास सांगितले.

या ॲपच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी गुंतवणूक योजनांबाबतची माहिती त्यांना दिली. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवून त्यांना जाळ्यात ओढण्यात आले. चोरट्यांंच्या खात्यात त्यांनी तीन महिन्यांत वेळोवेळी ३९ लाख ७४ हजार रुपये जमा केले. चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासविले. प्रत्यक्षात त्यांनापरतावा देण्यात आला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×