Breking News
MLC Election 2026 : विधान परिषदेच्या ५ पदवीधर व शिक्षक मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदानBaramati Wastewater Reuse : बारामतीत सांडपाण्यावर प्रक्रिया केलेल्या पाण्याचा पुनर्वापरPune News : पुण्यात २२ ऑक्टोबरला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज’चे जनजागृती सत्रPune Assault Cases : महिला पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण; कोरेगाव पार्कमधील घटनाPune Post Office : टपाल विभागाच्यावतीने २७ ऑक्टोबरला पेन्शन अदालतीचे आयोजनYerawada Drainage Pit Death Case : येरवड्यात खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यूPune Fodder Production Plan : पुणे जिल्ह्यात २५ हजार एकरांवर चारा उत्पादनाचे नियोजनPune Police : पुण्यातील १० गुन्हेगारांना तडीपारीचा दणकाPune Water Scarcity Action Plan : संभाव्य पाणीटंचाई निवारणासाठी त्रैमासिक कृती आराखडा तातडीने सादर करा – अमित पाथरवटPune Cyber Crime : पेन्शनकार्ड नोंदणीची बतावणी, जेष्ठाला ५ लाखांचा गंडा

Rabi Jowar Seeds Subsidy : रब्बी ज्वारीच्या बियाण्यांसाठी ५० टक्के अनुदान; महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन

पौष्टिक तृणधान्य उप अभियानांतर्गत शेतकरी गटांना पीक प्रात्यक्षिकांसाठी १०० टक्के अनुदान

marathinews24.com

पुणे – राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण उप अभियान-पौष्टिक तृणधान्य (NFSNM-NC) अंतर्गत सन २०२६-२७ या वर्षात रब्बी हंगामासाठी प्रमाणित ज्वारी बियाण्यांचे ५० टक्के अनुदानावर वितरण करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ महाडीबीटी पोर्टलद्वारे ऑनलाइन पद्धतीने देण्यात येणार असून, पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी संबंधित घटकांसाठी ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी आयुक्तांनी केले आहे.

दुष्काळी परिस्थितीत रब्बी पिकांसह चारा उत्पादनाला प्राधान्य – सविस्तर बातमी

या अभियानांतर्गत प्रमाणित बियाणे वितरण या घटकाचा लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. यामध्ये दहा वर्षांच्या आतील वाणांसाठी प्रतिकिलो ३० रुपये, तर दहा वर्षांवरील वाणांसाठी प्रतिकिलो १५ रुपये अनुदान अनुज्ञेय आहे. तसेच, पीक प्रात्यक्षिके या घटकांतर्गत शेतकरी गटांना बियाणे घटकासाठी १०० टक्के अनुदानाचा लाभ मिळणार आहे. या दोन्ही घटकांचे उद्दिष्टांक महाडीबीटी पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

या अभियानाच्या माध्यमातून प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिकांसोबतच एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, शेतकरी प्रशिक्षण तसेच जिल्हास्तरीय कृषी महोत्सव असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांमुळे पौष्टिक तृणधान्य पिकांचे उत्पादन वाढविणे, सुधारित तंत्रज्ञानाचा प्रसार करणे आणि शेतकऱ्यांना आधुनिक कृषी पद्धतींची माहिती उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

पात्र शेतकरी व शेतकरी गटांनी प्रमाणित बियाणे वितरण आणि पीक प्रात्यक्षिके या घटकांसाठी “महाडीबीटी पोर्टल” (https://mahadbt.maharashtra.gov.in) येथे जाऊन Farmer Login द्वारे ऑनलाइन अर्ज करावेत. अभियानातील इतर उपक्रमांची माहिती व लाभ मिळविण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

अधिक माहितीसाठी विभागीय कृषी सहसंचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×