४० वर्षीय व्यक्ती गंभीर जखमी, चतु:शृंगी पोलिसांची कारवाई
marathinews24.com
पुणे – Pune Wadawadi Attack Case : वैमनस्यातून एकाच्या गळ्यावर ब्लेडने वार करण्यात आल्याची घटना शिवाजीनगरमधील वडारवाडी भागात घडली. याप्रकरणी एकाला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली. मोहन बळवंत विटकर (वय ३६, रा. संगण्णा मित्र मंडळाजवळ, वडारवाडी, शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. राहुल शिवराम डाेंगरे (वय ४०, रा. वडारवाडी, शिवाजीनगर) असे जखमी झालेल्याचे नाव आहे. याबाबत डोंगरे याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
एटीएममध्ये मदतीचा बहाणा करून १ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विटकर आणि डोंगरे यांच्यात वाद झाला होता. १६ ऑक्टोबर रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास डोंगरे रिक्षात बसला होता. आरोपी विटकर दारू पिऊन तेथे आला. त्याने डोंगरे याला शिवीगाळ केली. शिवीगाळ केल्यानंतर डोंगरे तेथून निघाला. (Pune Wadawadi Attack Case) त्यानंतर घराजवळ डोंगरे याला विटकरने गाठले. त्याच्याशी पुन्हा वाद घातला. त्याला मारहाण केली. डाेंगरे याच्या गळ्यावर ब्लेडने वार करुन विटकर पसार झाला. गळा चिरल्याने डोंगरे गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पसार झालेला आरोपी विटकर याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत.




















