रिक्षाचा धक्का लागल्याने खड्ड्यात पडल्याची माहिती
marathinews24.com
पुणे – Pune Drainage Pit Accident : महापालिकेच्या ड्रेनेजच्या कामासाठी खोदलेल्या सात ते आठ फूट खोल खड्ड्यात पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना येरवडा येथील चित्रा चौक परिसरात घडली आहे. प्रदीप परदेशी (वय ६९, रा. येरवडा) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांच्या वाहनासमोर दुचाकी आडवी लावली; पोलिसांना अरेरावी करणारा जेरबंद – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप परदेशी हे भाजी मंडईकडे जात होते. चित्रा चौक परिसरात महापालिकेच्यावतीने ड्रेनेजचे काम सुरू होते. यासाठी रस्त्यावर खड्डा खोदण्यात आला होता. खड्ड्याच्या बाजूला बॅरिकेड्स लावण्यात आले होते. Pune Drainage Pit Accident परदेशी तेथून जात असताना समोरून आलेल्या रिक्षाचा धक्का त्यांना लागला. त्यामुळे तोल जाऊन ते खड्ड्यात पडले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या परदेशी यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
परदेशी यांचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी ड्रेनेजच्या खड्ड्यात पडल्याची घटना समोर आली. परदेशी यांच्या पार्थिवावर रविवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांकडून तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती लक्ष्मीनगर पोलिसांनी दिली आहे.




















