धनकवडीत ज्येष्ठ महिलेचे दागिने हिसकावले

रस्त्यावर तपासणी सुरू आहे, तुमचे दागिने काढून ठेवा...

पादचारी ज्येष्ठ महिलेचे ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार 

marathinews24.com

पुणे – पादचारी ज्येष्ठ महिलेचे दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना धनकवडी परिसरात घडली. एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार ज्येष्ठ महिला धनकवडी भागात राहायला आहेत. त्या शुक्रवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास धनकवडीतील हिल टाॅप सोसायटी परिसरातून निघाल्या होत्या. धनकवडी ते तळजाई रस्त्यावर दुचाकीस्वार चोरट्याने त्यांच्या गळ्यातील ९० हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील तपास करत आहेत.

तरुणीचा विनयभंग करणारा गजाआड; अटकेनंतर २४ तासात आरोपपत्र दाखल – सविस्तर बातमी 

तीन दिवसांपूर्वी कोथरूड, पाषाण परिसरात सकाळी फिरायला निघालेल्या महिलांसह, एका ज्येष्ठ नागरिकाकडील दागिने दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले होते. शहरात महिलांकडील दागिने हिसकाविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच लष्कर भागातील साचापीर स्ट्रीट परिसरात एकाच्या हातातील मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत एकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास साचापीर स्ट्रीट परिसरातून निघाले होते. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावून नेला. पोलीस उपनिरीक्षक मोकाटे तपास करत आहेत.

लष्कर भागात ज्येष्ठाला धमकावून लूट

ज्येष्ठ नागरिकाला धमकावून, तसेच त्याला धक्काबुक्की करुन चोरट्यांनी त्याच्याकडील पाकिट हिसकावून नेल्याची लष्कर भागात घटना घडली. यायाबत ज्येष्ठ नागरिकाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार वानवडी भागात राहायला आहेत. ते १० मे रोजी सरबतवाला चौक परिसरातून निघाले होते. त्यावेळी दोन चोरट्यंनी त्यांना अडवले. चोरट्यांनी त्यांच्या पाया पडण्याचा बहाणा केला. तेव्हा ज्येष्ठाने त्यांना विरोध केला. चोरट्यांनी झटापट करुन त्याच्या खिशातील पाकिट काढून घेतले. पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×