Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

महिलेच्या पिशवीतून ३ लाखांच्या दागिन्यांची चोरी

पुण्यात दिवसाढवळ्या सोनसाखळी हिसकावल्या

पुण्यातील बेलबाग चौक ते बाबू गेनू चौकातील घटना

marathinews24.com

पुणे – कपडे खरेदी केल्यानंतर त्याचे बील अदा करीत असताना चोरट्याने एका महिलेच्या पिशवीतून ३ लाख १ हजारांचे दागिने चोरून नेले. ही घटना ३१ मे रोजी दुपारी दोनच्या सुमारास बेलबाग चौक ते बाबू गेणू चौकापुढे दत्त मंदीराजवळ घडली आहे. याप्रकरणी पिंपरी-चिंचवड मध्ये राहणार्‍या ५५ वर्षीय महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

ऑनलाइन टास्कचे अमित पडले बारा लाखाला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला पिंपरी-िंचचवडमध्ये राहायला असून, कामानिमित्त ३१ मे रोजी दुपारच्या सुमारास मध्यवर्ती लक्ष्मी रोडवर आल्या होत्या. गणपती बाप्पाचे दर्शन घेतल्यानंतर संबंधित महिला कपडे खरेदी करण्यासाठी दत्त मंदीराजवळ गेल्या होत्या. त्यांनी कपडे विकत घेतल्यानंतर बील देताना, गर्दीचा फायदा घेउन चोरट्याने महिलेच्या पिशवीतील ३ लाखांचे दागिने चोरून नेले.

काही वेळानंतर महिलेला पिशवीत दागिने नसल्याचे जाणवले. त्यानंतर त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस अमलदार कदम तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×