‘डिजिटल’ अटकेची दाखवली भीती, पुण्यात ज्येष्ठाची ६ कोटींची केली फसवणूक

पनवेलमधून सायबर चोरटा अटकेत, पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

marathinews24.com

पुणे – काळ्या पैसा व्यवहारात डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून सायबर चोरट्याने पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाची ६ कोटी २९ लाखांची फसवणूक केली होती. याप्रकरणी सायबर चोरट्याला पनवेल परिसरातून अटक केली. सायबर पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. चोरट्याने डिजिटल अटक करण्याची भीती दाखवून ५ जणांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तुषार हरिश्चंद्र वाजंत्री (वय २८, रा. कोकबन, ता. रोहा, जि. रायगड) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

कोथरूड मध्ये घर पुढे १७ लाखाचे दागिने चोरीला – सविस्तर बातमी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाजंत्रीने पुण्यातील ज्येष्ठ नागरिकाच्या मोबाइलवर गेल्या वर्षी ९ नोव्हेंबर रोजी संपर्क साधला होता. पोलीस असल्याची बतावणी करीत त्याने जेष्ठ नागरिकाला काळ्या पैसा व्यवहारात (मनी लॉंड्रिंग) कारवाई करण्यात येणार असल्याची भीती दाखविली होती. डिजिटल अटक करण्यात येणार असून, ज्येष्ठाला तातडीने पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानंतर ९ ते १९ नाेव्हेंबर दरम्यान ज्येष्ठाने वाजंत्रीच्या बँक खात्यात ६ कोटी २९ लाख रुपये जमा केले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने शिवाजीनगर सायबर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली.

सायबर पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास सुरू होता. आरोपीच्या बँक खात्याचा तपासात रक्कम जमा झाल्याचे उघडकीस आले. आरोपी वाजंत्रीने ९० लाख आणि २० लाख रुपये एका बँकेत मुदतठेव स्वरुपात ठेवले होते. संबंधित बँक खाते कोकबन येथील श्री. धावीर कन्स्ट्रक्शनचे असल्याचे उघड झाले. सायबर पोलिसांचे पथकाने आरोपी वाजंत्री आणि साथीदाराला ताब्यात घेण्यासाठी कोकबन येथे गेले. पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच तो पसार झाला.

आरोपी वाजंत्री पनवेलमध्ये असल्याची माहिती खबऱ्याने दिली. त्यानुसार सापळा रचून वाजंत्रीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध सुरू असून, आरोपी वाजंत्रीला न्यायालयाने ५ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राजुदास चव्हाण, मुंढे, कोंडे, बाळासाहेब चव्हाण, जान्हवी भडेकर, संदिप पवार, संदिप यादव, सचिन शिंदे, सतिश मांढरे यांनी केली.

केरळ पोलीस सायबर चोरटा तुषार वाजंत्रीच्या मागावर होते. सायबर पोलिसांनी केरळ पोलिसांशी संपर्क साधला आहे. वाजंत्रीबरोबर असलेल्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपीविरुद्ध वेगवेगळ्या राज्यात ‘नॅशनल सायबर पोर्टल’वर एकूण पाच तक्रारी दाखल आहेत. संबंधित ५ गुन्ह्यात वाजंत्रीचा सामील असल्याचे उघडकीस आले आहे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×