Breking News
पर्वतीत घरफोडी; साडेनऊ लाखांचा ऐवज चोरीलापुण्यात सायबर चोरांकडून चौघांची ३० लाखांची फसवणूकबिल्डर विशाल अग्रवालच्या अडचणी वाढणार ?गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुणे विभागातील १०२ लाभार्थ्यांना मिळणार लाभखताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाईग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी घेतला आषाढीवारी तयारीचा आढावाछळामुळे संगणक अभियंता तरुणीची इमारतीतून उडी मारुन आत्महत्यानशामुक्त भारत अभियानांतर्गत येरवडा येथे जनजागृती कार्यक्रम संपन्नआंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजनपुरंदर विमानतळ प्रकल्पग्रस्तांसाठी २२ जून रोजी सकाळी ११ वाजता विशेष कॅम्प; न्यायिक, अर्धन्यायिक व महसुली प्रकरणांचा जागेवर निपटारा

पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे दागिने चोरीला

स्वारगेट परिसरात सलग घटना

marathinews24.com

पुणे – शहरातील मध्यवर्ती स्वारगेट पसिरातील पीएमपीएल बसस्थानकात चोरट्यांची टोळी सक्रिय झाली असल्याचे दिसून आले आहे. सलग दुसर्‍या दिवशी महिलेच्या पिशवीतून ७० हजारांचे दागिने चोरून नेल्याची घटना १ जूनला घडली आहे. याप्रकरणी आंबेगावमध्ये राहणार्‍या महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, दरदिवशी पीएमपीएल बसस्थानकात होणार्‍या चोर्‍यांमुळे स्वागरेट पोलिसांकडून खबरदारी घेतली जाणार की नाही, असा प्रश्न प्रवाशांनी विचारला आहे.

आम्ही इथले भाई, रामटेकडीत टोळक्याचा राडा; हवेत शस्त्रास्त्रे फिरवित केली दगडफेक – सविस्तर बातमी

पीएमपीएल बसमध्ये प्रवेश करीत असताना गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून मोबाइल, सोन्या-चांदीचे दागिने असा ७० हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना १ जूनला दुपारी साडेबाराच्या सुमारास स्वारगेट बसडेपोत घडली आहे. याप्रकरणी ३९ वर्षीय महिलेने फिर्याद दाखल केली आहे. तक्रारदार महिला काम आटोपून बसडेपोतून आंबेगाव परिसरात जाण्यासाठी बसची वाट पाहत थांबल्या होत्या.

बस आल्यानंतर महिला गाडीत प्रवेश करीत असल्याची संधी साधून, चोरट्यांनी त्यांच्या पिशवीतील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड, मोबाइल असा ऐवज चोरून नेला. काही वेळानंतर महिलेला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

जेष्ठेच्या हातातील सोन्याची पाटली कापून नेली.

पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी एका जेष्ठ महिलेच्या हातातील १ लाख ५० हजार रूपये किंमतीची सोन्याची पाटली कापून नेली. ही घटना २३ मे रोजी संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेट बसस्थानकात घडली आहे.

याप्रकरणी वडगाव बुद्रूकमध्ये राहणार्‍या ७४ वर्षीय महिलेने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार जेष्ठ महिला वडगाव बुद्रूकमध्ये राहायला असून, कामानिमित्त २३ मे रोजी स्वारगेट परिसरात आल्या होत्या. काम संपल्यानंतर संध्याकाळी पावणेसहाच्या सुमारास स्वारगेटमधील नटराज हॉटेलजवळील बसस्थानकातून बसमध्ये प्रवेश करीत होत्या. त्यावेळी गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या सोन्याची पाटली कापून नेली.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×