Breking News
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पालखी मार्गावरील फलकधारकांना महापालिकेने दिल्या सूचनामहिलेच्या छेडछाडीवरून तरूणाचा खूनमाऊलींचे अश्व आळंदीत दाखल; मंदिरात अश्वांचे स्वागतभंडारा डोंगर पायथ्याला ‘कॉरिडॉर’ विकसित करणारमोदी सरकारने ११ वर्षांच्या कार्यकाळात विकसित भारताचा पाया रचला – रविंद्र चव्हाणजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची शासकीय महापूजापद्मश्री मारुती चितमपल्ली यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजलीसहा वर्षांच्या मुलासह महिलेची इमारतीतून उडी मारून आत्महत्याजेजुरीत भीषण अपघात, ८ जण ठार, चौघे जखमीमित्राचा खून करुन पसार झालेल्याला इंदूरमधून अटक

तडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले

तडीपाराने काढला कोयता, भीतीने नागरिक सैरावैरा पळाले

कॅम्प परिसरातील घटना

marathinews24.com

पुणे – तडीपार असतानाही शहरात येउन कोयत्याच्या धाकाने सराईताने नागरिकांमध्ये दहशत निर्माण केल्याची घटना १ जूनला रात्री दहाच्या सुमारास कॅम्पमधील भोपळे चौकाजवळ घडली आहे. आरोपीने कोयता दाखविताच परिसरातील नागरिक सैरावैरा पळत असल्याचे दिसून आले. त्यासोबतच व्यावसायिकांनी दुकाने बंद केल्यामुळे संबंधिताची दहशत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मलंग मेमन (वय २९ रा. भिमपुरा, कॅम्प) असे गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे. याप्रकरणी महिलेने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पीएमपीएल बसच्या धडकेत पादचारी ठार – सविस्तर बातमी 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला १ जूनला रात्री दहाच्या सुमारास भोपळे चौकातून दुचाकीवर प्रवास करीत होती. त्यावेळी आरोपी पायी जात असताना त्याचा तोल जाउन महिलेच्या दुचाकीचा आधार घेउन थांबला. त्यानंतर त्याने महिलेला शिवीगाळ करीत त्यांना गाडी हळू चालव असे म्हटले. शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्यामुळे आरोपी मलंगने कंबरेला असलेला कोयता बाहेर काढला. मला तू बोलते काय, थांब तुझ्याकडे आज बघतोच, आज तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्याने धमकाविले. त्यामुळे कोयत्याला पाहून आजूबाजूचे लोक सैरावैरा पळू लागले. काही दुकानदारांनी शटर बंद केल्याचेही तक्रारीत नमूदकेले आहे.

संबंधित आरोपी मलंग हा सराईत असून, त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, त्यानंतरही तो शहरात मिळून आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार बनसोडे तपास करीत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 403
  • Message : The request cannot be completed because you have exceeded your quota.
error: Content is protected !!
Scroll to Top