Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

असंघटित कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार

असंघटित कामगारांचे प्रश्न लवकरच सोडवणार

कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची ग्वाही

marathinews24.com

पिंपरी – राज्यातील असंघटित कामगारांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी कष्टकरी संघर्ष महासंघाच्या शिष्टमंडळाने मंत्रालयात कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट घेतली. असंघटित क्षेत्रातील कामगारांचे विमा संरक्षण, सामाजिक सुरक्षा, वेतनवाढ, अपघातानंतरची भरपाई तसेच नोंदणी व पोर्टल व्यवस्थेच्या अंमलबजावणीबाबत चर्चा करण्यात आली.

महापालिकेच्या जागांवर महामेट्रोचा डोळा – सविस्तर बातमी 

घरेलू कामगार मंडळासाठी निधी उपलब्ध करणे, रिक्षाचालकांसाठी अपघाती विमा संरक्षण योजना सुरू करणे, कंत्राटी व असंघटित कामगारांना गृहसुविधा योजना लागू करणे, बांधकाम कामगारांची पडताळणी संख्या प्रतिदिन ५० वरून २०० पर्यंत वाढवणे तसेच कामगार लाभाची मंजुरी जलद गतीने पूर्ण करणे, अशा मुद्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. कामगार नोंदणी पोर्टल सुरू करण्याची गरज आहे. असंघटित कामगारांना त्यांच्या हक्कासाठी विविध खात्यांमध्ये हेलपाटे मारावे लागतात.

यावर उपाययोजना म्हणून ऑनलाइन प्रणाली अमलात आणावी, अशी मागणी करण्यात आली. मंत्री फुंडकर यांनी सर्व मागण्या ऐकून घेतल्या. लवकरच असंघटित कामगारांसाठी स्वतंत्र बैठक घेऊन प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. शिष्टमंडळात कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, भास्कर राठोड, मनोज पाटील आणि महादेव गायकवाड उपस्थित होते.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×