Breking News
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खूनटेम्पोच्या धडकेत पादचारी ठार, चालक अटकेतप्रधानमंत्री आदर्श ग्राम योजनेंतर्गत राज्यातील आदर्श गावांची मंगळवारपासून पडताळणी मोहीमपुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभ

शस्त्र परवाना प्रकरणी सुशील हगवणेला जामीन मंजूर

शशांक हगवणे, नीलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात

marathinews24.com

पुणे – पोलिसांची दिशाभूल करून शस्त्र परवाना मिळवल्याप्रकरणी वैष्णवी हगवणेचा दीर सुशील हगवणे याला न्यायालयाने मंगळवारी (दि. १०) जामीन मंजूर केला. शस्त्र परवाना प्रकरणात कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या आणखी एका गुन्ह्यात वैष्णवीचा पती शशांक आणि हगवणे कुटुंबीयांचा निकटवर्तीय नीलेश चव्हाण यांना कोथरूड पोलिसांनी मंगळवारी ताब्यात घेतले. हगवणे कुटुंबीय सध्या येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे.

मोटारीच्या धडकेत बैलाचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल – सविस्तर बातमी

सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आत्महत्या केली होती. तिच्या मृत्यू प्रकरणात पती शशांक, दीर सुशील, सासू-सासरे, नणंद, तसेच नीलेश चव्हाण यांना अटक करण्यात आली. शशांक, सुशील, नीलेश यांनी एकाच वर्षी पुणे पोलिसांकडून शस्त्र परवाने मिळवले होते. शशांक आणि सुशील हे मुळशी तालुक्यातील भुकूम येथे राहायला आहेत. दोघांनी परवान्यासाठी पुण्यातील वास्तव्याचा पत्ता दिला होता. वारजे आणि कोथरूड पोलीस ठाण्यात त्यांनी भाडेतत्वावर घेतलेल्या सदनिकेचा करारनामा दिला होता. शस्त्र परवाना प्रकरणात त्यांनी पोलिसांची दिशाभूल केल्याचे उघडकीस आले होते.

त्यानंतर त्यांच्याविरुद्ध कोथरूड आणि वारजे पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले होते. कोथरूड पोलिसांनी न्यायालयात अर्ज करून सुशील हगवणे याला सोमवारी अटक केली होती. त्याला न्यायालयाने मंगळवारी जमीन मंजूर केला. सरकारी वकील पल्लवी काशिद यांनी बाजू मांडली. न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली. येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या शशांक हगवणे आणि नीलेश चव्हाण यांना मंगळवारी ताब्यात घेण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×