Breking News
‘दगडूशेठ’ गणपती मंदिरात शेषनागाच्या प्रतिकृतीची पुष्पसजावटमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सखी-सुखदाचा आनंदोत्सव उत्साहात साजरावेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोघांविरूद्ध कारवाईपुण्यातही भोंदूबाबा खरातची पुनरावृत्ती, महिलेवर अत्याचारविशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम प्रक्रिया शनिवारपासून सुरुसमाज कल्याण आयुक्त दीपा मुधोळ मुंडे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात नशामुक्त भारत अभियानाचा शुभारंभमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते पुणे- साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेसेवेचा शुभारंभकल्याण रेल्वे यार्ड सुरक्षेसाठी अधिवेशनात उच्चस्तरीय बैठक‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावेखरीप पिकांसाठी रुंद सरी-वरंबा (BBF) पद्धतीने पेरणी करण्याचे आवाहन

हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक- आमदार महेश लांडगे

हिंजवडीच्या प्रश्नासंबंधी विभागीय आयुक्तांकडे बैठक- आमदार महेश लांडगे

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या निर्देशानंतर प्रशासनाची कार्यवाही

marathinews24.com

पिंपरी-चिंचवड – हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीमध्ये पहिली आढावा बैठक होणार आहे. त्यामध्ये संबंधित सर्व शासकीय विभागांचे अधिकारी सहभागी होतील, अशी माहिती भाजपा आमदार महेश लांडगे यांनी दिली. हिंजवडी आयटी पार्कमधील वाढत्या नागरी व वाहतूक समस्यांचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालबद्ध कार्यक्रम आखून, विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून सिंगल पॉईंट एथॉरिटी हिंजवडीचे प्रश्न मार्गी लावतील, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर प्रशासनाने तात्काळ कार्यवाही सुरु केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर होत असलेल्या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहेत.

“आपत्तीला तोंड देण्यासाठी एकात्म, जागरुक समाजाची आवश्यकता -आयुक्त नवलकिशोर राम – सविस्तर बातमी   

महाराष्ट्रातील सर्वात मोठा ‘आयटी हब’ असलेला हिंजवडी परिसर समस्यांनी ग्रासला आहे. येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सध्या ऐरणीवर आहे. या परिसरात दररोज सुमारे पाच लाखांहून अधिक आयटी व्यावसायिक येथे ये-जा करतात. मात्र, अपुरी पायाभूत सुविधा, वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुर्दशा आणि समन्वयाचा अभाव या समस्यांमुळे रहिवासी व कर्मचाऱ्यांचे आयुष्य कठीण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर “हिंजवडी आयटी पार्कला अडथळ्यांमधून मुक्त करा” अशी मागणी या परिसरातील कर्मचारी, स्थानिक नागरिक,आयटी फोरम, सोसायटी फेडरेशन यांनी केल्यानंतर या मागणीकडे खऱ्या अर्थाने आमदार लांडगे यांनी लक्ष वेधले.

त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी याबाबत संवाद साधत मुंबईमध्ये संबंधित विभाग, आयटी फोरम सोसायटी फेडरेशन अशा सर्वांची बैठक आयोजित केली होती. दरम्यान, या सर्व घडामोडीनंतर आमदार महेश लांडगे यांनी याचा पाठपुरावा करत तातडीने बैठक घ्यावी, अशी मागणी विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे केली. विभागीय आयुक्तांची पहिली बैठक असून या बैठकीसाठी सर्वांचेच लक्ष लागले आहे.

हिंजवडीमधील समस्या सोडवण्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. सर्व विभागांचे एकत्रीकरण करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेतली. मुख्यमंत्री यांच्या निर्देश दिल्यानुसार, ‘सिंगल पॉइंट अथोरिटी’ म्हणून विभागीय आयुक्त यांची बैठक होईल. आगामी काळात हिंजवडी समस्या मुक्त होईल, असा विश्वास आहे. – महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×