Breking News
राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य ध्वजारोहण समारंभहडपसरमध्ये दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठाचा मृत्यूहवाई दलातील तोतया जवानाला पकडलेसराईत चौघे पुणे जिल्ह्यातून तडीपार; वाघोली पोलिसांची कारवाईनोंदणीकृत सेवादातांकडूनच कृत्रिम रेतन करा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–2026’परदेशी अभ्यास दौऱ्यात सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहनचाकण एमआयडीसी परिसरातील सर्व रस्ते २५ ऑगस्टपर्यंत खड्डेमुक्त करा – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे निर्देशखुनातील आरोपीला १२ कोयत्यांसह पकडलेसायबर फसवणूकीच्या रकमेसाठी बँक खात्याचा वापर

आपत्कालीन परिस्थितीत बचाव कार्यासाठी महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज

marathinews24.com

पिंपरी – पावसाळ्यात उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेचा अग्निशमन विभाग सज्ज झाला आहे. अग्निशमन विभागाने प्रत्येक प्रभागनिहाय विशेष पूर नियंत्रण पथके कार्यरत केली आहेत. या पथकांची जबाबदारी पूरस्थितीत त्वरित मदत पुरवणे, नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करणे आणि परिसरातील बचावकार्य सुकर करणे, अशा स्वरूपाची असणार आहे.

पंकजाताई मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त जिजामाता रुग्णालयात भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या हस्ते रुग्णांना फळवाटप – सविस्तर बातमी

महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडे बचाव कार्यासाठी पुरेशा प्रमाणात उपकरणे उपलब्ध आहेत. त्यामध्ये १० रबर बोट्स, २०० लाइफ जॅकेट्स, ४४ लाइफ रिंग्स, ५९ रोप्स, १० हुक्स, १३ पोर्टेबल पंप, वॉटर टेंडर, क्विक रिस्पॉन्स व्हेईकल, फायर फायटिंग मोटारसायकल, ४८ कार्यरत अग्निशमन वाहने, वायरलेस सेट्स, वॉकीटॉकी, मेगाफोन व टॉर्चेस यासारख्या आधुनिक साहित्यांचा समावेश आहे.

नागरिकांनी आपत्कालीन परिस्थितीत संबंधित प्रभागीय कार्यालय अथवा अग्निशमन केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. जेणेकरून आपत्तीकालीन परिस्थितीमध्ये पथके त्वरित घटनास्थळी पोहोचतील. तसेच ज्या भागात पाणी शिरण्याचा धोका आहे, अशा भागांची यादी तयार करण्यात आली असून त्या भागात पथकांनी गस्त वाढवली आहे.

आवश्यकतेनुसार १०० (पोलीस), १०१ (अग्निशमन), १०८ (आपत्कालीन मदत क्रमांक) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.

पथकांची जबाबदारी व कामकाज

महापालिकेच्या पथकांमध्ये प्रशिक्षित कर्मचारी असून ते पूरग्रस्त भागांची ओळख, पाण्याची पातळी, वाहणाऱ्या पाण्याचा वेग आणि साचणाऱ्या ठिकाणांची माहिती ठेवतात. पथकांना स्थानिक परिसराचे अचूक ज्ञान आहे तसेच पथकातील सदस्यांना पोहण्याचे व रेस्क्यू तंत्राचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तरी पूरस्थिती किंवा कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास घाबरून न जाता, चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकांची मदत घ्यावी. ही मदत पूर्णतः विनामूल्य उपलब्ध आहे, असेही अग्निशमन विभागाकडून कळवण्यात आले आहे.

आपत्तीकालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आमचा अग्निशमन विभाग सज्ज आहे. पावसाचे पाणी भरलेल्या घरांमधून पंपिंग यंत्रांच्या मदतीने पाणी बाहेर काढणे, झाड पडल्यास चेन सॉने मार्ग मोकळा करणे, तसेच रबर बोट व लाइफ जॅकेटच्या साहाय्याने लोकांना सुरक्षित स्थळी हलवणे अशी सर्व व्यवस्था सज्ज आहे. नदीकाठच्या भागात देखील बचाव कार्य करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. – उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×