Breking News
दारू पिताना झालेल्या वादातून मित्राची हत्यागुजरातहून पुण्यात विक्रीसाठी आणलेला २२ लाखांचा गुटखा जप्तएकल महिला धोरणासाठी कार्यशाळा संपन्नस्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत नवउद्योजकांना मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनमहिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी महाराजस्व शिबिरामध्ये प्रमाणपत्र वाटप करा-डॉ. नीलम गोऱ्हेसफाई कामगारांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावापुण्यात समरसता लोककला संमेलनाचे २८ जूनला आयोजनइतिहासातून पर्यावरण संवर्धनाची प्रेरणा घेण्याची गरज-प्र. के. घाणेकरदगडूशेठ दत्तमंदिर ट्रस्टच्या नव्या विश्वस्तांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याची मागणी फेटाळलीऑलिम्‍पिकपटू बंडा पाटील खाशाबा जाधव पुरस्काराने गौरवित

दुकानातून टायर चोरणारा गजाआड

दुकानातून टायर चोरणारा गजाआड

हडपसर, लष्कर, भारती विद्यापीठ परिसरातील गुन्हे उघड

marathinews24.com

पुणे – दुकानातून टायर चोरणारा गजाआड – टायर विक्री करणार्‍या दुकानांचा दरवाजा उचकटून टायर चोरणार्‍या चोरट्याला काळेपडळ पोलिसांनी अटक केली. चोरट्याने हडपसरमधील काळेपडळ, लष्कर, भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील टायर विक्री करणार्‍या दुकानांमधून टायर चोरून नेल्याचे तपासात उघडकीस आले आहे. चोरट्याकडून साडेतीन लाख रुपयांचे टायर जप्त करण्यात आले आहेत.

पुण्यातील तो कुंटणखाना ३ वर्षांसाठी सीलबं; पोलीस आयुक्तांचा दणका – सविस्तर बातमी 

परवेज लियाकत काझी (वय ४५, रा. सय्यदनगर, हडपसर) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. काझी याने काळेपडळ, लष्कर, कात्रज परिसरातील गोकुळनगर परिसरातील टायर विक्री करणार्‍या दुकानांचा दरवाजा उचकटून टायर चोरून नेले होते. या प्रकरणाचा काळेपडळ पोलिसांकडून तपास करण्यात येत होता. पोलीस कर्मचारी महादेव शिंदे, लक्ष्मण काळे यांनी काळेपडळ परिसरातील टायर विक्री दुकानाच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपास सुरू केला. काझी याने टायर विक्री करणार्‍या दुकानाचा दरवाजा उचकटून चोरी केल्याची माहिती तपासात मिळाली. चोरलेले टायर रिक्षात टाकून तो पसार व्हायचा.

पोलिसांनी काळेपडळ परिसरात सापळा लावून काझीला पकडले. त्याच्याकडून तीन लाख ५३ हजार रुपयांचे टायर जप्त करण्यात आले आहेत. परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, प्रवीण काळभोर, दाऊद सय्यद, प्रतीक लाहिगुडे, श्रीकृष्ण खोकले, विशाल ठोंबरे, शाहीद शेख, लक्ष्मण काळे, नितीन शिंदे, अतुुल पंधरकर, नितीन ढोले, सद्दाम तांबोळी यांनी ही कामगिरी केली.

पुणे स्टेशन परिसरात महिलेचे दागिने हिसकावले

पादचारी महिलेच्या गळ्यातील एक लाख २५ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना पुणे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध पोलिासांनी गुन्हा दाखल केला. महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला धनकवडी भागात राहायला आहेत. महिला मंगळवारी (३० जुलै) सकाळी पावणेसातच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरातून निघाल्या होत्या. त्यावेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख २५ हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरडा केला. चोरटे भरधाव वेगात पसार झाले. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यात येत असून, पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. सहायक पोलीस निरीक्षक शिवशांत खोसे तपास करत आहेत.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×